असे होणार ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेले ‘चांद्रयान-२’ सोमवारी (ता. २२) दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात झेपावणार असून, त्यासाठीची उलटगणती रविवारी  संध्याकाळी सहा वाजून ४३ मिनिटांनी सुरू झाल्याची माहिती ‘इस्रो’कडून आज देण्यात आली.

चेन्नई - मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेले ‘चांद्रयान-२’ आज सोमवारी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात झेपावणार असून, त्यासाठीची उलटगणती रविवारी  संध्याकाळी सहा वाजून ४३ मिनिटांनी सुरू झाल्याची माहिती ‘इस्रो’कडून आज देण्यात आली.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की तांत्रिक दोष आढळून आल्यानंतर आम्ही ‘चांद्रयान- २’ मोहिमेची उलटगणती थांबविली होती. यानातील तांत्रिक दोष शोधून ते दूर करण्यात आले. त्यानंतर आम्ही पुन्हा अनेकदा चाचण्या घेतल्या, त्यामुळे आता पुन्हा कुठलाही दोष निर्माण होण्याची शक्‍यता नाही. 

तब्बल ४५ दिवस प्रवास केल्यानंतर ‘जीएसएलव्ही मार्क- ३’ हा प्रक्षेपक ‘चांद्रयान- २’ला चंद्राच्या कक्षेत पोचविणार आहे. अखेरच्या १५ मिनिटांमध्ये ‘चांद्रयान- २’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर घिरट्या घालणार असून, त्यानंतर ‘प्रग्यान’ ही बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे, असे सिवन यांनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News