बोल्ड थीम असणाऱ्या चित्रपटात काम करणं आव्हान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • सोनाक्षी सिन्हा ‘खानदानी शफाखान’ या चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारणार असून, चित्रपटाची कथा सेक्‍स क्‍लिनिक चालवणाऱ्या बबिता बेदी या महिलेवर आहे.
  • बोल्ड थीम असणाऱ्या चित्रपटात काम करणं सोनाक्षीसाठी आव्हान होतं. पण गोष्ट समजून घेतल्यानंतर ती चित्रपट करण्यास तयार झाली.

सोनाक्षी सिन्हा ‘खानदानी शफाखान’ या चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारणार असून, चित्रपटाची कथा सेक्‍स क्‍लिनिक चालवणाऱ्या बबिता बेदी या महिलेवर आहे.

बोल्ड थीम असणाऱ्या चित्रपटात काम करणं सोनाक्षीसाठी आव्हान होतं. पण गोष्ट समजून घेतल्यानंतर ती चित्रपट करण्यास तयार झाली. दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता यांनी केले आहे. त्या म्हणतात, ‘आजही आपल्या देशात सेक्‍स या विषयावर खुलेपणाने बोललं जात नाही.

शिवाय लैंगिक चाचणीसारखे गुन्हेही आपल्या देशात घडतात. या विषयांवर हा चित्रपट भाष्य करणार आहे.’ येत्या २ ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News