104 वर्षाच्या गंगू बाईची परिस्थितीशी झुंज

दीपक घरत
Monday, 24 June 2019
  • काही काळातच हमाली करणाऱ्या गंगुबाईंच्या नवऱ्याला आजाराने गाठल्याने घर गाडा सांभाळण्या साठी गंगुबाईंनी भाजी विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला
  • पालिका कर्मचारी देतात त्रास 

  • काही ग्राहक स्वतःहून करतात मदत 

पनवेल : वय वर्ष फक्त १०४ असल्याचा दावा करणाऱ्या गंगूबाई कदम या गेली ७० वर्ष पनवेल शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. ह्या वयात देखील रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्या गंगुबाईंची जिद्द आजही एखाद्या तरुणिला लाजवणारी आहे. घरात बसून राहिले तर शरीर आखडेल या भीती मुळे आजही त्या पनवेलच्या भाजी मार्केट मध्ये जाऊन होलसेल दरात आणलेली भाजी शहरातील विविध भागात किरकोळ दरात विक्री करण्याचे काम करतात.

मूळच्या कराड येथील वेहे गावच्या असलेल्या गंगुबाई वयाच्या २० साव्या वर्षी नवऱ्या सोबत पनवेल मध्ये वास्तव्यास आल्या. ज्या वर्षी त्या पनवेल मध्ये राहायला आल्या त्या वर्षी महात्मा गांधीची हत्या झाल्याचे गंगुबाईंना अद्यापही आठवते आहे. पनवेल मध्ये आल्या नंतर काही वर्ष चांगली गेली. मात्र काही काळातच हमाली करणाऱ्या गंगुबाईंच्या नवऱ्याला आजाराने गाठल्याने घर गाडा सांभाळण्या साठी गंगुबाईंनी भाजी विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

उच्च समाजाच्या असल्याने त्या वेळी त्यांच्या भावांनी गंगुबाईंच्या निर्णयाला विरोध दर्शवत आपल्या समाजातील स्त्रिया रस्त्यावर बसून व्यवसाय करत नसल्याचे दरडावले. नवऱ्याला सोड आणि आमच्या कडे येऊन राहा असा हट्ट करणाऱ्या भावांना स्पष्ट नकार कळवत जो पर्यंत शरीर साथ देईल तो पर्यंत स्वतः कामं करूनच पोट भरणार असा निर्धार गंगूबाईंनी बोलून दाखवला. एका अपघाता मुळे आजारी असलेल्या आपल्या ५५ वर्षीय मुला सोबत खंबीर पणे भाजी व्यवसाय करत आहेत.

पालिका कर्मचारी देतात त्रास 

मेहनतीने जगण्याचा प्रयत्न करत असलेल्या गंगुबाईंना सध्या पालिका कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार गंगुबाई करतात. कर्मचारी हुसकावून लावत असल्याने व्यवसाय करण्यात अडचण येत असल्या बाबत त्या नाराजी व्यक्त करतात.

काही ग्राहक स्वतःहून करतात मदत 

एवढ्या वर्ष व्यवसाय करत असल्याने शहरातील अनेक प्रतिष्ठित स्वतःहून गंगू बाईंना मदत करत असल्याची माहिती गंगुबाई यांनी दिली. अनेकांनी तर आपल्या घरी येऊन राहण्याचीही विनंती केल्याचे गंगुबाई आवर्जून सांगतात पण हे सांगत असताना आज काळ आपले आपल्याला जास्त दिवस विचारात नाही अश्या वेळेला दुसरे किती दिवस सांभाळणार असे सांगत त्या सर्वाना स्पष्ट नकार कळवतात

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News