क्रीडा साहित्यासाठी केंद्राकडे कोट्यवधीचे प्रस्ताव खितपत

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

अकोला  - गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या क्रीडा संकुलमधील जलतरण तलाव सुरू होणार अाहे. हा तलाव पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा क्रीडा प्रशासनाने नऊ कोटी रूपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला अाहे. यासोबतच स्वीम ट्रॅंकींग ट्रॅकसोबतच रायफल शुटींग अाणि बॉक्सिंगच्या अत्याधुनिक साहित्यासाठी कोट्यवधीचे प्रस्ताव पाठविण्यात अाल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली अाहे.

क्रीडा प्रशासनाच्या खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राने यंदा अव्वल क्रमांक पटकाविला होता. खेलो इंडियामध्ये विविध क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करीत महाराष्ट्र राज्य अव्वल, तर हरियाणा द्वितीय अाणि दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर होते. अाता अागामी काळात होऊ घातलेल्या अाॅलिम्पिक स्पर्धेत दमदार खेळाडू निर्माण व्हावे म्हणून, अत्याधुनिक साहित्य पुरविले जात अाहे. तेव्हा अकोल्यातील तरण तलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी किमान नऊ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला गेला आहे.

क्रीडा संकुलमधील तरण तलाव आणि इतर व्यायाम शाळेच्या सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, शासनाकडे नऊ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल पुढे आला. त्यामुळे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. जर या प्रस्तावास मंजुरी मिळाली तर अकोल्यात एक नव्हे, तर दोन तरण तलाव अकोलेकरांच्या सेवेत येणार अाहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News