ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 8वी पास असणे गरजेचे नाही; मंत्री गडकरींचा महत्त्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

नवी दिल्ली: अशिक्षित किंवा कमी शिकलेले असल्याने तरुणांना इच्छा असूनही ड्रायव्हर म्हणून काम मिळत नाही. कारण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सरकारने 8वी पास असणे बंधनकारक केले होते. मात्र, आता नितीन गडकरी यांनी आठवी पास असण्याचा नियम शिथिल केला आहे. यामुळे अशिक्षित किंवा न शिकलेली व्यक्तीही आता ड्रायव्हींग लायसन्स काढण्यास पात्र ठरणार आहे. भारतातील वाहतूक क्षेत्रात सध्याच्या काळात 22 लाखांहून जास्त वाहनचालकांची आवश्यकता आहे. नितीन गडकरींच्या अखत्यारीतील दळणवळण मंत्रालयाने दूरदृष्टी आणि रोजगाराचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: अशिक्षित किंवा कमी शिकलेले असल्याने तरुणांना इच्छा असूनही ड्रायव्हर म्हणून काम मिळत नाही. कारण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सरकारने 8वी पास असणे बंधनकारक केले होते. मात्र, आता नितीन गडकरी यांनी आठवी पास असण्याचा नियम शिथिल केला आहे. यामुळे अशिक्षित किंवा न शिकलेली व्यक्तीही आता ड्रायव्हींग लायसन्स काढण्यास पात्र ठरणार आहे. भारतातील वाहतूक क्षेत्रात सध्याच्या काळात 22 लाखांहून जास्त वाहनचालकांची आवश्यकता आहे. नितीन गडकरींच्या अखत्यारीतील दळणवळण मंत्रालयाने दूरदृष्टी आणि रोजगाराचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. याबाबत स्वत: नितीन गडकरींनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

 

समाज के कम पढ़े-लिखे और गरीब लोग ड्राइविंग से रोजगार की सम्भावना तलाशते हैं। सरकार ने आठवी तक की पढ़ाई की अनिवार्यता हटा दी है जिससे उनकी पढ़ाई के कारण रोजगार न रुके। ट्रांसपोर्ट सेक्टर में भी 22 लाख से अधिक ड्राइवरों की कमी है, इससे लाखों जिंदगीयां बेहतर हो सकती हैं। pic.twitter.com/RVcP2oG139

— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 18, 2019

 या ट्विटसोबतच गडकरींनी देशभरात ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी 2 लाख स्किल सेंटर उघडणार असल्याचे घोषित केले आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता अडाणी व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार आहे. बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी यामुळे उपलब्ध होऊ शकेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News