गोविंदाच्या सुरक्षेला प्राधान्य देत उत्सव साजरा करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

मुंबई : पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदाच्या सुरक्षेला प्राधान्य देत गोविंदा मंडळांना व आयोजकांना सुलभतेने परवानग्या देण्यात याव्यात आणि उत्सव साजरा करावा, असे निर्देश क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात दिले. दहीहंडी उत्सव याबाबत सोमवारी मंत्रालयात क्रीडा मंत्र्यांच्या दालनात क्रीडामंत्री अॅ़ड. आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली.

पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांचा 10 लाखां पर्यंत विमा उतरवण्यात यावा, ध्वनी प्रदूषण होऊ नये, तसेच गोविंदाच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, मँट याचा वापर करण्यात यावा उत्सव स्थळी ॲम्बुलन्स उपलब्ध असावीत, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या अटींचे पालन करून आयोजक आणि गोविंदा पथक यांना परवानग्या सुलभतेने देण्यात याव्यात, अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने या बैठकीत मांडली.

अॅड. आशिष शेलार यांनी समन्वय समितीने मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करुन परवानगी देताना शासकीय यंत्रणेने त्यामध्ये सुलभता आणावी, असे निर्देश दिले. गोविंदा पथकांचा विमा, तसेच वाहतूक नियंत्रणाचा प्लॅन याबाबतही पोलिसांनी दक्षता घ्यावी असेही सांगितले. या बैठकीला विशेष महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था मिलिंद भारांबे, कायदा सुव्यवस्था सह आयुक्त मनोजकुमार चौबे, प्रसंचालक सांस्कृतिक कार्य मिनल जोगळेकर, यांच्या सह दहिहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, सुरेंद्र पांचाळ, समिर सावंत, गिता झगडे, अभिषेक सुर्वे, डेव्हिड फर्नाडिस, समिर पेंढारे, अरुण पाटील आदी उपस्थित होते.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News