सामाजिक भान जपत तरूणाईकडून 'फ्रेंडशीप डे' साजरा

जागृती बोरसे
Sunday, 4 August 2019

मैत्रीची भावना जपत आणि समाजाप्रती काहीतरी करण्याची उर्मी असणाऱ्या शिरपुरमधील काही तरूणांनी एकत्र येऊन हा मैत्रीदिन कै. बापुसाहेब एन. झेड. मराठे विधायक संस्थेचे थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात त्यांच्यासोबत साजरा केला. 

शिरपुर ता. दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी तरूणाईकडून 'फ्रेंडशीप डे' म्हणजेच 'मैत्री दिन' उत्साहात साजरा केला जातो.

मैत्री हे आयुष्यातील सर्वांत सुंदर व निरागस नाते आहे, ज्याला जात, धर्म, वर्ण, वर्ग असं कुठलही बंधन नाही, जी निर्मळ आहे, चराचरात आहे, अशी मैत्री जपण्यासाठी अनेक तरूण-तरूणी हा मैत्रीदिन मोठ्या जल्लोषात साजरा करतात. त्यासाठी बाजारात विविध भेटवस्तु, आकर्षक फ्रेंडशीप बँड अशा वस्तूंना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते.

यापलीकडे अजून एक हृदयापासून सामाजिक कार्याची जाणीव करून देणारी देखील एक मैत्री असते, जी मनाला एक वेगळच समाधान देणारी असते. अशीच मैत्रीची भावना जपत आणि समाजाप्रती काहीतरी करण्याची उर्मी असणाऱ्या शिरपुरमधील काही तरूणांनी एकत्र येऊन हा मैत्रीदिन कै. बापुसाहेब एन. झेड. मराठे विधायक संस्थेचे थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात त्यांच्यासोबत साजरा केला. 

यात भेटवस्तुंवर कुठलाही वायफळ खर्च न करता जमवलेल्या पैशांमधून अनाथ मुलांसाठी मिष्ठांन्नाचे वाटप करून साजरा केला. यामध्ये आर. सी पटेल औषध निर्माणशास्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा, 'सकाळ- यिन'च्या सदस्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. जेवणानंतर अनाथ मुलांना फ्रेंडशीप बँड बांधून मैत्रीचा धागा जपत त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान टिपत या तरूणांनी या मैत्रीदिनाला वेगळेपणा प्राप्त करून दिला.

अनाथ मतिमंद मुलांसोबत मैत्रीदिन साजरा करताना 'यिन'चे धुळे जिल्हा कौशल्य विकास महामडंळ अध्यक्ष मनिष मुसळे 'यिन'चे सदस्य राहुल कुवर, कुणाल बहाळकर, गीतेश पातुरकर, राहुल गिरासॆ, प्रथमेश धामणे, विवेक मुसळे, कौस्तुभ चौधरी, वैभव बोराळे, लतिश जैन, धनंजय चव्हाण, रितुल हिरवे, लक्ष्मी चैनानी, रुतुजा ब्राम्हणकार आदी विध्यार्थी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News