'जगात भारी आम्ही कोल्हापुरी' कुत्र्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

कोल्हापूर : कोल्हापूरातील शिवाजी पेठ येथील बॅटमिंटन कोच असणाऱ्या प्रणव जाधव यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या टफी या कुत्र्याचा सातवा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. आज दिवसभर संपूर्ण कोल्हापुरात या अनोख्या वाढदिवसाची चर्चा सुरु होती. या अनोख्या वाढदिवसामुळे जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ असे म्हणावे लागेल.

शिवाजी पेठ येथे राहणारे बॅटमिंटन कोच प्रणव जाधव यांना पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. २०१३ मध्ये टफी या लॅबरॉडॉर जातीच्या कुत्र्याला आपल्या घरी आणले होते. त्यावेळी टफी अवघ्या ४ महिन्यांचा होता. या आवडीतूनच त्यांनी टफीला घरी आणले. अवघ्या काही दिवसातच टफी जाधव कुटुंबियाचा एक महत्वाचा घटक म्हणून घरी वावरू लागला होता. सर्व जाधव कुटुंबियांचा टफीवर खूप लळा आहे. 

नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि शेजाऱ्यांना बोलवून जाधव कुटुंबियांनी या प्रेमाखातर टफीचा सातवा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. घरात एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस असतो अगदी त्याप्रमाणे जाधव कुटुंबियांनी घर सजविले होते. टफीने केक कापल्यानंतर उपस्थितांना चॉकलेट, बिस्कीट, गुलाब जामून, बोन स्टिक आशा खाद्य पदार्थांची मेजवानी देण्यात आली होती. कोल्हापुरातील शिवाजी पेठ आज टफीचा शानदार वाढदिवस अनुभवत आहे. आज दिवसभर शिवाजी पेठेत टफी कुत्र्याच्या वाढदिवसाची चर्चा सुरु होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News