सलाम या किल्ले पुरंदरास...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

संपूर्ण बळानिशी मराठे मोगली लोंढा अडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते।पण मुळातच त्यांचे बळ तुटपुंजे होते अखेर मोगली माऱ्यामुळे सफेद बुरजाची बरीच नासधूस झाली मोगल सफेद बुरजाच्या रोखाने पुढे सरकले त्यांनी बुरजाच्या पायथ्याशी सुरुंग खोदायला सुरवात केली...

संपूर्ण बळानिशी मराठे मोगली लोंढा अडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते।पण मुळातच त्यांचे बळ तुटपुंजे होते अखेर मोगली माऱ्यामुळे सफेद बुरजाची बरीच नासधूस झाली मोगल सफेद बुरजाच्या रोखाने पुढे सरकले त्यांनी बुरजाच्या पायथ्याशी सुरुंग खोदायला सुरवात केली...

सफेद बुरुज व काळा बुरुज यामधील तटात मराठ्यांनी बरीच दारू भरू ठेवली होती. यामागील हेतू असा होता की, समजा मोगलांनी सफेद बुरुज जिंकून काळ्या बुरुजावर हल्ला चढविण्याचे ठरविलेचं तर तटावरील दारूला आग लावून द्यायची. सफेद बुरुजाचा पाया खणायला सुरवात केली आणि अकस्मात तटावरील दारुने पेट घेतला. प्रचंड स्फोट होऊन अंदाजे ८० मराठे त्यात होरपळून निघाले...

दैवाने मोगलांवर एकप्रकारे खैरचं केली सफेद बुरुज पडला व मोगल पुरंदर माचीला येऊन भिडले. तरही जणूकाही घडलेच नाही अशा आवेगाने मराठे लढतचं होते. अखेर बुरुजावरून तोफांचा मारा सुरु झाला. आणि मोगलांनी देखील लाकडी दमदमे उभारून तोफांची सलामी देण्यास सुरवात केली यातच बुरुजावरील मराठे जखमी होऊ लागले...

अखेर तो व त्याच्याजवळील दुसरा बुरुज खाली करून मराठे बालेकिल्ल्यावर निघून गेले २ जून १६६५ रोजी पुरंदर माची व पाच बुरुज मोगलांच्या ताब्यात गेले तरीही पुरंदर लढतचं होता लढतचं होता....पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News