गाजरांची शौचालयाच्या पाण्यात पायाने मळणी, व्हिडीओ पाहून धक्का बसेल

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Sunday, 18 August 2019

गाजर धुण्यासाठी ते पहिल्यांदा पाण्याच्या गोल टाकीत ओतलं जातं. त्यात पाणी भरलं जातं आणि गाजरांना भिजू दिलं जातं. गाजर भिजलं की चिखलही मोकळा होतो. मग त्या टाकीत एक माणूस उतरतो आणि पायाने त्या गाजरांना मळायला सुरुवात करतो.

नवी मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात गाजर ज्युस विकलं जातं. गाजर विक्रेत्यांपर्यंत येताना ते कोणत्या पद्धतीने येतं हे पाहिलं तर तुम्हाला गाजर खावंसं वाटणार नाही. कारण, शौचालयाच्या पाण्यात ही गाजरं स्वच्छ केली जातात आणि पुढे छोट्या विक्रेत्यांसह ग्राहकांना विकली जातात. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आल्याने हा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे गाजर धुणारे कर्मचारी पायाने गाजर धुतात. वाशी एपीएमसीमधील  हा प्रकार असल्याचं समोर आलंय.

गाजर धुण्यासाठी ते पहिल्यांदा पाण्याच्या गोल टाकीत ओतलं जातं. त्यात पाणी भरलं जातं आणि गाजरांना भिजू दिलं जातं. गाजर भिजलं की चिखलही मोकळा होतो. मग त्या टाकीत एक माणूस उतरतो आणि पायाने त्या गाजरांना मळायला सुरुवात करतो.

गाजरासोबत टाकीत उतरलेली व्यक्तीही पाण्यात उभा असते. गाजर भिजवण्यासाठी शौचालयाला वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर केला जात असल्याचंही समोर आलंय. गाजर ही खाण्याची वस्तू आहे, जी हातांऐवजी पायाने साफ केली जाते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जातोय.

पाहा व्हिडीओ

नवी मुंबईतील वाशी एपीएमसीमध्ये घाऊक भाजीपाला बाजारात दररोज दहा ते बारा गाड्या भरुन केशरी गाजर येतात. नाशिक, पुरंदर, राजस्थान, मध्य प्रदेश या भागातून ही गाजरे येतात. गाजर एपीएमसीमध्ये येतं तेव्हा ते चिखलाने माखलेलं असतं. पण ते धुण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते याचा एक व्हिडीओ समोर आलाय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News