जपानी भाषेतील करिअरच्या संधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

जपानी व्यवस्थापन असणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये जपानी भाषा जाणणारे कर्मचारी हवेच असतात, त्याव्यतिरिक्त इन्फोसिस, टीसीएस अशा भारतीय कंपन्यादेखील जपानी बोलू शकणाऱ्या इंजिनिर्सना प्राधान्य देतात

ही आशियाई भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. जपान हा एक विकसित देश असल्याने आणि भारत सरकार व जपानी सरकार यांच्यात काही करार झाल्याने अनेक जपानी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. फुजितसू, होंडा या काही नावाजलेल्या कंपन्या आपल्याला माहीत आहेतच. जपानी व्यवस्थापन असणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये जपानी भाषा जाणणारे कर्मचारी हवेच असतात, त्याव्यतिरिक्त इन्फोसिस, टीसीएस अशा भारतीय कंपन्यादेखील जपानी बोलू शकणाऱ्या इंजिनिर्सना प्राधान्य देतात. जपानी भाषेच्या अभ्यासानंतर JLPT (Japanese language prefesiancy test) च्या N५ पासून N१ पर्यंतच्या परीक्षा देत येतात. चांगल्या नोकरीची संधी हवी असेल तर N३ प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असते. 

जपानी भाषा शिकवणाऱ्या संस्था : 

परकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे
S I F I L (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News