नर्सिंग क्षेत्रात घडवा करिअर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

व्यक्तीच्या आरोग्याची देखभाल/संवर्धन करू शकणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका होय. या व्यवसायाचे मोल जाणून आज 'नर्सिंग' या करिअरला महत्त्व स्थान प्राप्त झाले आहे. आपणही या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता. 

व्यक्तीच्या आरोग्याची देखभाल/संवर्धन करू शकणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका होय. या व्यवसायाचे मोल जाणून आज 'नर्सिंग' या करिअरला महत्त्व स्थान प्राप्त झाले आहे. आपणही या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता. 

 कामाचे स्वरूप : डॉक्टरांनी दिलेले औषध/प्रिस्क्रिशन प्रमाणे देणे, रुग्णाला संपूर्ण माहिती देणे, रुग्णांच्या नातेवाईकांना आजराबद्दल माहिती देणे, व्यायाम, आहार, घ्यावयाची काळजी याची माहिती एक परिचारिकाच योग्य प्रकारे देत असते.
 
नर्सिंगमधील विविध अभ्यासक्रम :  डॉक्टरेट पीएच.डी (नर्सिंग), रिसर्च, एम.फिल. (नर्सिंग), पदव्युत्तर- एम.एससी. (नर्सिंक), पदवी (पोस्ट बेसिक), पी.बी. बी. एससी (नर्सिंग), (बेसिक) बी.एससी (नर्सिंग), पदविका (पोस्ट बेसिक) 

 पात्रता - या अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा 16 ते 24 इतकी असून किमान पात्रता भौतिक, रसायन, जीवशास्त्र तसंच इंग्लिश हे विषय बारावीसाठी घेऊन  त्यात किमान 45 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. हा अभ्यासक्रम डिप्लोमा आणि डिग्री अशा दोन्ही पदव्यांनंतर करू शकतो. 

संधी : प्रत्येक केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालय, विशेष उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या शासनाच्या विविध रुग्णालयांमध्ये नर्सेसची अनेक पदे आहेत. तसेच स्वतंत्र नर्सिंग केअरही देऊ शकतात. 

 शिक्षण संस्था : 
● कस्तुरबा नर्सिग कॉलेज, वर्धा, 
● सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिग, कोल्हापूर
● बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे
● सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ नर्सिग, पुणे
● गुरुनानक इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग एज्युकेशन वांद्रे, मुंबई
● लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिग, मुंबई 
● जी.एस. मेडिकल कॉलेज, परळ, मुंबई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News