फूड प्रोडक्शन व्यवसायात करा करिअर; कमाईची मोठी संधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी उद्योग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे फूड प्रॉडक्शनच्या व्यवसायात चांगली कमाई करण्याची संधी अशा तरुणांना मिळू शकते.

जेवण बनविण्याची आवड असलेल्यांसाठी मोठ्या प्रमाणात करिअर संधी सध्या उपलब्ध झाली आहे. हॉटेल मॅनेजमेंट याशिवाय देखील अनेक असे पर्याय आहेत, ज्याठिकाणी तरुण आपलं करिअर घडवू शकतात. विविध खाद्यपदार्थांची आवड असलेले आणि त्याबाबत माहिती असलेले  फूड प्रोडक्शन मॅनेजर पदावर काम करू शकतात. हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी उद्योग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे फूड प्रॉडक्शनच्या व्यवसायात चांगली कमाई करण्याची संधी अशा तरुणांना मिळू शकते.

हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ दिसून आली आहे. त्यामुळे यामध्ये येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. हॉटेलमध्ये तसेच रेस्टोरंटमध्ये आपला बिझनेस वाढवणारे कमी नाहीत. याच बिझनेसमध्ये करिअर करून "फूड प्रोडक्शन" या पदावर देखील तरुणांना काम करता येऊ शकते. त्यामुळे "फूड प्रोडक्शन" हा हॉटेल व्यवसायाशी निगडित असा करिअरचा पर्याय म्हणून आपण पाहू शकतो.  

कसे असेल कामाचे स्वरूप : 
हॉटेल किंवा रेस्टोरंटमध्ये विविध पदार्थ तयार करणे, हे फूड प्रोडक्शन क्षेत्रातील महत्वाचे काम आहे. याशिवाय रोजचा मेन्यू ठरवणे, संपूर्ण किचन स्टाफची जबाबदारी फूड मॅनेजरवर असते. याशिवाय शेफकडून तयार होणारे जेवण हे कोणत्या पद्धतीने तयार केले आहे, याची दखल घेणे. कारण कोणत्याही हॉटेलचे जेवण हे ग्राहकांची संख्या कमी जास्त करण्यात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. 

काय आहे पात्रता?
या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानुसार पदविका तसेच पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या गोष्टींसोबतच स्वयंपाक तयार करण्याची किंवा आवड असणे महत्वाचे आहे.  

रोजगाराच्या संधी
हॉटेल व्यवसायात करिअर करायचे असल्यास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात. फूड क्राफ्ट, फूड प्रॉडक्शन, फूड अँड बेवरेजेस सर्व्हिस, किंवा बेरी कन्फेक्शनरी विषयात पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधींचे अनेक दरवाजे उघडतात. हॉटेल किंवा रेस्टॉरंट, एअर केटरिंग, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग, फूड प्रोसेसिंग कंपन्या, कन्फेक्शनरी, थीम रेस्टॉरंट, मॉल्स, बेस किचन, खासगी रुग्णालये, क्रूझ लाइनर, कॉर्पोरेट केटरिंग अशा अनेक ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होते. 

एवढी होईल कमाई
 या क्षेत्रात सुरुवातील शिकाऊ म्हणून फूड मॅनेजरला १० ते १५० हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय अनुभवानंतर यामध्ये वाढ होताना दिसते. दहा वर्षांच्या अनुभवानंतर कमाई ५० हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. हॉटेल मॅनेजमेंट विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप आणि प्रशिक्षण घ्यावे लागते. फूड प्रॉडक्शन मॅनेजरचे प्रशिक्षण घेतल्यानंतर याशिवाय अनुभवाची जोड असल्यास वर्षाला  सहा ते बारा लाखांपर्यंत कमाई सहजपणे करता येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News