फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या वाटा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

चित्रकलेची, रेखाटनाची आवड तसेच निरीक्षण, कल्पकता, सृजनशीलता, नावीन्य, निर्मिती, तंत्रज्ञान, संवाद कौशल्य इत्यादींचे ज्ञान आवश्यक आहे.

जुन्या स्टाईलचे कपडे नवे रुपडं धारण करून ते पुन्हा बाजारात आणणे आणि त्याला चांगल्या प्रकारे किंमत मिळवून देणे, हे कसब आणि कौशल्य फॅशन डिझायनरचे असते. चित्रकलेची, रेखाटनाची आवड तसेच निरीक्षण, कल्पकता, सृजनशीलता, नावीन्य, निर्मिती, तंत्रज्ञान, संवाद कौशल्य इत्यादींचे ज्ञान आवश्यक आहे. यामध्ये 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत अशा वेगवेगळ्या कालावधीचे अभ्यासक्रम असतात. 

कोर्सेस आणि अभ्यासक्रम : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि पर्ल या व्यतिरिक्त अन्य संस्थांतूनही प्रशिक्षण घेता येते. फॅशन डिझाईनमध्ये गारमेंट, लेदर, अ‍ॅक्सेसेरिज आणि ज्वेलरी डिझाईन तसेच फॅशन बिझनेस मॅनेजमेंट, फॅशन रिटेल मॅनेजमेंट, फॅशन मार्केटिंग हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

पात्रता : विज्ञान, कला, वाणिज्य यांसारख्या कोणत्याही शाखेचे विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. काही संस्थामध्ये प्रवेशापूर्वी चाचणी परीक्षाही घेतात, तर काही ठिकाणी केवळ 10-12 वीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. अनेक संस्थेत प्रवेशासाठी लेखी परीक्षा, समूह चर्चा, मुलाखत यांचा प्रवेशासाठी निकष ठेवण्यात येतो.

करिअरच्या वाटा : या क्षेत्रात क्रिएटिव्हीटी आणि टॅलेंटला अनेक संधी उपलब्ध आहेत.फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रोडक्शन, मार्केटिंग, फॅशन रिटेल कंपनी, ब्युटीक्स, एक्स्पोर्ट हाऊस, मॅन्युफॅक्चिरग युनिट या ठिकाणी संधी मिळतील. फॅशन मीडिया क्वालिटी कंट्रोल, फॅशन अ‍ॅक्सेसरिज डिझाईन आणि ब्रँड प्रमोशन, कॉश्च्यूूम डिझायनर, फॅशन कन्सल्टंट, टेक्निकल डिझायनर, ग्राफिक डिझायनर, प्रोडक्शन पॅटर्न मेकर, फॅशन कोऑर्डीनेटर आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनुभवानंतर स्वत:चा व्यवसाय सुद्धा सुरू करता येऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News