वैद्यकीय प्रवेशाचा 70/30 फार्मुला रद्द करण्यासाठी  परभणीत विद्यार्थी व पालकांचा बोंबाबोंब मोर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

सध्या चालू असलेला वैद्यकीय प्रवेशासाठी असणारा ७०/३० टक्केचा फॉर्मुला हा नियमबाह्य आहे. या फॉर्मुल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थांवर अन्याय होत आहे.

परभणी - सध्या चालू असलेला वैद्यकीय प्रवेशासाठी असणारा ७०/३० टक्केचा फॉर्मुला हा नियमबाह्य आहे. या फॉर्मुल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थांवर अन्याय होत आहे. त्यामुळे तातडीने हा फॉर्मुला रद्द करावा, या मागणीसाठी शहरातील विद्यार्थी, पालक यांच्यासह संभाजीसेनेच्यावतीने मंगळवार (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला.

मराठवाडाभर संभाजीसेना व मराठवाडा विद्यार्थी व पालकसंघ यांच्या वतीने बोंबाबोंब मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी परभणी येथे बोंबाबोब मोर्चाच्या माध्यमातून सदर ७०/३० असंवैधानिक अन्यायकारक कोठा हा रद्द करण्याकरीता सर्व पालक एकत्र आले. आरक्षण हे घटनाबाह्य आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी चालू अधिवेशनात या घटनाबाह्य आरक्षणाच्या विरुद्ध मंत्रायालच्या पायरीवर आंदोलन केले. तसेच पदविधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर अपेक्षीत आहे. आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील विद्यार्थी, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, गुरुकुल आणि संभाजी सेनेच्या वतीने मंगळवार, २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यार्थी व पालकांसह शिवाजी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोब मोर्चा काढूण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News