हाच प्रादेशिक पक्ष भाजपाला रोखू शकतो ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • एमआयएम भाजपाचा विजयरथ रोकणार
  • मुस्लिम  मतदारांमुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय

हैदराबाद - 40 टक्के मुस्लिम मतदार असल्यामुळे वायनाडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय झाला. देशात मुस्लिमांसाठी जागा हवी, पण मुस्लिम समाजाला कोणाची भीक नको अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांनी केली आहे. 

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की हा नवा भारत आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर आणि कोट्यावधी लोकांचा हा भारत देश असेल. पण मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको हक्क हवेत असं ओवेसी तेलंगणा येथे जनतेला संबोधित करताना म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर टीका केली होती. मुस्लीम समाजाला देशात बरोबरीचे हक्क आहेत. भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहोत असे ओवेसी म्हणाले होते. हैदराबाद येथील मक्का मस्जिद येथे एका सभेला ते संबोधित करत होते.

त्यावेळी ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०० जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना वाटत असेल, तर तसे होणार नाही. मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने दिले आहे. जर मोदी हे मंदिरमध्ये जाऊ शकतात तर मुस्लीम व्यक्ती ही मस्जिदमध्ये जाऊ शकतात असे, ओवेसी म्हणाले. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवेसी म्हणाले होते. तसेच भाजपाचा विजयरथ रोकण्याची ताकद फक्त प्रादेशिक पक्षांमध्ये आहे असेही ओवेसी म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News