राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत केंब्रिज स्कूलचे यश

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019
  • छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे १४ व १७ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत केंब्रिज स्कूलने कांस्यपदक पटकावले. छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे १४ व १७ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नांदेड, नागपूर, मुंबई, पुणे येथून विभागस्तरीय विजेते संघ सहभागी झाले होते. 

या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात औरंगाबाद विभागाचे केंब्रिज स्कूलने प्रतिनिधित्व केले. केंब्रिज स्कूलने आपल्या पहिल्या सामन्यात नांदेड शहरचा ३-० ने पराभव केला. या सामन्यात पुष्कर पाटील याने एक, अनिरुद्ध सिधेवाडने दोन गोल केले. त्यानंतर उपांत्य फेरीत कोल्हापूर संघासमोर पराभव पत्करावा लागला.

परंतु, नियमानुसार उपांत्य फेरीत हरलेले संघ कांस्यपदकासाठी खेळतात. केंब्रिजचा हा सामना नाशिकच्या सेंट झेवियर्स स्कूल सोबत झाला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात केंब्रिजने ४-३ ने नाशिकच्या सेंट झेवियर्स स्कूलचा पराभव करीत कांस्यपदक पटकावले. या सामन्यात सरल संचेती, हर्षवर्धन दिघे, शार्दुल कुंटे व मिसम खानने यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News