असा बनवा बिस्किटांचा केक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019

साहित्य - ग्लुकोज बिस्कीट पुडा (१० रुपयेवाला), २ चमचे पिठीसाखर, पाऊण चमचा बेकिंग पावडर (किंवा इनो सॅशे), १ कप दूध, काजू-बदाम पूड (ऐच्छिक).

साहित्य - ग्लुकोज बिस्कीट पुडा (१० रुपयेवाला), २ चमचे पिठीसाखर, पाऊण चमचा बेकिंग पावडर (किंवा इनो सॅशे), १ कप दूध, काजू-बदाम पूड (ऐच्छिक).

कृती - प्रथम बिस्किटाचे तुकडे करावे. नंतर मिक्सरला बारीक पूड (चुरा) करावा. एका बाऊलमध्ये घेऊन त्यात पिठीसाखर घालावी. काजू-बदाम पूड टाकावी. दूध फ्रीजमधले नसावे. थोडे कोमट असावे. मिश्रणात थोडेथोडे घालावे व कालवावे. साधारण भज्याला भिजवतो तसे मिश्रण करावे. घट्ट करू नये. केकला सैलसर ठेवावे. (चमच्याने वरून पडले पाहिजे) नंतर बेकिंग पावडर घालावी. परत मिश्रण हलवावे. ॲल्युमिनिअमच्या डब्याला तुपाचा हात लावावा. मिश्रण ओतावे. कुठलाही डबा किंवा थोडे पसरट भांडे घेतले तरी चालेल. गॅसवर तवा मंद तापत ठेवावा (किंवा पसरट कढईत खाली छोटी ताटली ठेवावी) डबा ठेवून त्यावर झाकण ठेवावे. २५-३० मिनिटे मंद गॅसवर ठेवावा. केक फुलून येईल. गार झाल्यावर कापावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News