भारताची परंपरा अपरंपार; अमेरिकेतले तरुण करतात पत्रावळ्यांचा व्यवसाय

सुरज पाटील (यिनबझ)
Wednesday, 8 May 2019

भारतात गेल्या खूप वर्षांपासून खूप परंपरा चालत आलेल्या आहे. त्यात भारताची संस्कृती आणि त्याचबरोबर भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीदेखील त्या परंपरेचा एक भाग आहेत. भारतीय परंपरेचा असाच एक भाग म्हणजे  भारतात बनवल्या जाणाऱ्या नैसर्गिक पत्रावळ्या.

भारतात गेल्या खूप वर्षांपासून खूप परंपरा चालत आलेल्या आहे. त्यात भारताची संस्कृती आणि त्याचबरोबर भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा देखील समावेशस आहे. भारतीय परंपरेचा असाच एक भाग म्हणजे  भारतात बनवल्या जाणाऱ्या नैसर्गिक पत्रावळ्या.

देशातला तरुण हा वेगवेगळे उद्योग करण्यास तयार झाला आहे. मात्र त्या उद्योगांमध्ये पारंपारिक गोष्टींवर आधारित असलेले कोणतेच उद्योग करण्यास तरुण तयार नाहीत. पण भारतातल्या याच पारंपारिक गोष्टींच्या आधारे विदेशातले तरूण आपला व्यवसाय थाटत आहेत. त्यातून मिळणारा नफा हा अफाट असल्याचे देखील त्यांचे म्हणने आहे.

कसा असतो पत्रावळ्याचा उद्योग...
काही वर्षांपूर्वी (काही प्रमाणात आतादेखील, मात्र आता वनस्पतींच्या पानापासून पत्रावळ्या बनवणे कमी झाले आहे) भारतात गावाच्या ठिकाणी लोक घरोघरी पत्रावळ्या बनवून आपल्या समारंभामध्ये त्याचा वापर करत असत. त्याचे रुपांतर घरगूती उद्योगात झाले आणि काही प्रमाणात लोक पत्रावळ्या बनवून विकू लागले. या सर्वांमध्ये पत्रावळ्यांचा व्यवसाय सुरू झाला. वर्ष 2017च्या आधी महाराष्ट्रातील काही भागात हा व्यवसाय जोमाणे केला जात होता, मात्र अधुनिक तंत्रज्ञानामुळे वनस्पतींच्या ऐवजी कागदी पत्रावळ्यांचा वापर सर्रास होऊ लागला.

वनस्पतीपासून बनवलेल्या पत्रावळ्या कमी होत आहेत...
गेल्या काही दिवसांपासून देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमातून कागदी पत्रावळ्यांचा वापर जास्तप्रमाणात सुरू आहे. वनस्पतींचे होणारे नुकसान हेही त्यामागचं कारण आहेच, मात्र त्याहीपेक्षा त्यामागे लागणारी मेहनत हेदेखील महत्वाचं कारण बनले आहे. वनस्पतींच्या पत्रावळ्या बनवण्यासाठी जास्त मेहनत गरजेची असते, मात्र त्याहीपेक्षा कागदी पत्रावळ्या  बनवण्याचं अधूनिक तंत्रज्ञान आल्यामुळे वनस्पती पत्रावळ्या कमी होत चालल्या आहेत.

काय आहे पत्रावळ्यांच्या व्यवसायात फायदा?
पन्नास कागदी पत्रावळ्यांचा सध्याचा भाव सत्तर रुपये आहे, म्हणजेच एक रुपया चाळीस पैश्याला एक पत्रावळी असा भाव आहे. पण यामागे पत्रावळी बनवण्याची मशीन आणि एका व्यक्तीची मेहनत अशी एकूण एका पत्रावळीला पन्नास पैशाची मेहनत लागत असते. त्यामुळे कागदी पत्रावळी बनवण्याचा खर्च हा नक्कीच वनस्पती पत्रावळ्या बनवण्याच्या हेतूने कमीच आहे.

भारतातून हद्दपार झालेल्या पत्रावळ्या विदेशात बनतात रोजगाराचे साधन

अमेरिकेतील तरुणांचा पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय...
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आणि आपण त्याचा फायदा उचलला पाहिजे, या हेतूने पूढे येत विदेशातले खासकरून अमेरिकेतले युवक पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. वनस्पतीच्या पत्रावळ्या या वेगळ्या आकाराच्या त्याचबरोबर वेगळ्या डिझाईननु्सार बनवल्या जात असल्याने विदेशी नागरिकांचे याकडे चांगलेच आकर्शन वाढले आहे. 

कागदी तसेच प्लास्टिक पत्रावळ्यांचा वापर जास्त होत असल्याने प्रदुषणामध्येदेखील मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विदेशी तरुणांनी हा उपाय शोधला आहे. हा फक्ती उपाय नाही तर कित्येक तरुणांना रोजगारदेखील या व्यवसायामुळे तिथे उपलब्ध झाले आहेत.

विदेशामध्ये लीफ रिपब्लिक या कंपनीकडून राबवण्यात आलेला 'हा' उपक्रम...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News