विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कायम

दिलीप गंभीरे
Friday, 28 June 2019

कळंब - शासनाच्या आदेशानुसार यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होईल, असे वाटत होते. मात्र, जिल्हा परिषद शाळांसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कायम असून शासनाच्या या निर्णयाला सर्व शाळांकडून कलाटणी देण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कळंब - शासनाच्या आदेशानुसार यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होईल, असे वाटत होते. मात्र, जिल्हा परिषद शाळांसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कायम असून शासनाच्या या निर्णयाला सर्व शाळांकडून कलाटणी देण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

त्यामुळे शासनाच्या आदेशाची अनेक शाळांकडून अवहेलना होत असून दप्तरांचे ओझे कमी करण्यात शिक्षण विभाग अद्याप निद्रेतच आहे. 
शैक्षणिक वर्गानुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे वजन कमी करण्याचे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. याची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविली आहे.
मात्र, येथील गटशिक्षण कार्यालय प्रभारीवर चालत असल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराच्या ओझ्याचे कुणाला काही देणेघेणे नसल्यासारखी स्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रत्येक तासानुसार पुस्तके, वह्या, जेवण डबा, पाणी बॉटल हे ओझे पाठीवर घेत शाळा गाठावी लागते.

ओझ्यामुळे पाठ, मान, कंबरदुखीचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाचा निर्णय जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व खासगी शाळांना बंधनकारक आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार शाळांनी प्लॅनिंग करावे, अशा सूचना असूनही उपाययोजना शाळांकडून झालेल्या दिसून येत नाहीत.

आठवड्यातील दोन दिवस दप्तरविरहित दिवस म्हणून पाळण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आहेत. तालुकास्तरावरील सर्व शाळांना गटशिक्षण अधिकाऱ्यांनी भेटी देणे गरजेचे आहे. शासनाच्या धोरणानुसार उपाययोजना करण्यासंदर्भात तंबी देण्याची सूचना असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गटशिक्षण अधिकारी प्रभारी असल्याने सध्यातरी कुठल्याच शाळेकडे फिरकले नसल्याचे कळते. शासनाच्या आदेशाला हरताळ शिक्षण विभागाने शाळांची नियमित पडताळणी करून मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करावे, असे स्पष्ट आदेश असतानाही आदेशाला हरताळ फासला जात आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News