बुंदीचे लाडू ही आहे खास टीप्स...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

साहित्य -

१ कप बेसन, खाण्याचा पिवळा रंग किंवा हळद, तेल, १ कप साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, गरजेनुसार पाणी, सजावटीसाठी ५० ग्रॅम सुकामेवा आणि लिंबू.

पूर्वतयारी -
-सुरुवातीला थोडा साखरेचा पाक तयार करून ठेवा.
-थोडा सुकामेवा भाजून तयार ठेवा.
-पुढील कृती करण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.

कृती -

एका भांड्यात बेसन आणि थोडे पाणी घालून ते चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे. त्यात खाण्याचा पिवळा रंग किंवा हळद टाकून ते एकत्र करा. झारा किंवा फ्राईंग चमच्याच्या मदतीने बुंदी तळून घ्या. खुसखुशीत होईपर्यंत बुंदी तळत राहा. त्यानंतर ती बाजूला काढून थंड होऊ द्या. 
दुसऱ्या एका पॅनमध्ये साखरेचा पाक घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस घाला. त्यामध्ये वेलची पावडर, भाजलेला सुकामेवा, तळलेली बुंदी टाका. सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. आता चाळणीच्या मदतीने बुंदी बाहेर काढून थोड्या वेळाने त्याचे लाडू तयार करा. अशाप्रकारे बुंदीचे लाडू तयार.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News