अर्थसंकल्प फुटला, विरोधकांचा सभात्याग : मुख्यमंत्र्यांचा पलटवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
  • विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही हरकत फेटाळून लावत विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन

मुंबई : राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत विरोधकांत अचानक चलबिचल सुरू झाली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी मध्येच हरकत घेत अर्थमंत्री विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत असताना बाहेर सोशल मीडियात तो अगोदरच प्रसारित होत असल्याचा आक्षेप घेतला. हा अर्थसंकल्प फुटला असून, अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. सोबत हातात अर्थसंकल्पातील काही घोषणा ट्‌विटरवर आल्याचा हवाला देत त्यांनी अर्थसंकल्प रोखून धरला. 

त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही हरकत फेटाळून लावत विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन केले. सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे अर्थसंकल्पाच्या भाषणावर बहिष्कार घालत विरोधकांनी सभात्याग केला.

सध्या समाज माध्यमे बदलत आहेत. सभागृहात अर्थमंत्री ज्या घोषणा करीत आहेत; त्या पंधरा मिनिटांच्या फरकाने सोशल मीडियामध्ये प्रसारित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी विरोधक सोशल मीडियाचा उत्तम वापर करतात; पण त्यांनी सकारात्मक बाबीसाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण घ्यायला हवे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News