भाऊ, टेल मी व्हॉट आय डोंट नो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 October 2019

बॉलीवूडमधील मोस्ट एनर्जेटीक, हॅण्डसम अशी बरीच विशेषणे एका अभिनेत्या मिळाली तो अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. त्याने अगदी कमी कालावधीत अधिक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘सिम्बा’. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर कोटींची कमाई केली. तसेच रणवीरने साकारलेला संग्राम भालेराव म्हणजेच ‘सिम्बा’ हे मराठी पात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्‍यावर उचलून घेतलं. ‘

सिम्बा’सारखा मजेशीर पोलिस मॅन सिनेरसिकांना आपल्यातला वाटला. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन तर कमालीचेच. दिग्दर्शन, निर्मिती, स्टारकास्ट या साऱ्याच बाबतीत यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाने २०१८मधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले. रणवीरची या चित्रपटामधील डान्स स्टाईल, ॲक्‍शन उल्लेखनीय होती. त्याच्या संवादांनाही प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. त्याने या चित्रपटामधील कलाकार सोनू सूदला उद्देशून म्हटलेला एक संवाद विशेष लोकप्रिय ठरला आणि तो संवाद म्हणजे ‘भाऊ, जे मला माहीत नाही ते सांगा, टेल मी व्हॉट आय डोंट नो’.

रणवीरने मराठीमध्ये म्हटलेला हा संवाद अगदी सुपरडुपर हिट ठरला. सोशल मीडियावर तर अनेकांनी या संवादाचे व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली. आजही हा संवाद तितकाच ताजातवाना आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News