बंधू प्रेम

 संयुक्‍ता सचिन लाटकर
Tuesday, 9 July 2019

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा पंधरा वर्षांची होते. आमच्या शेजारील घरात एक नवरा - बायको राहत होते. त्यांना मूल नव्हते. बायकोच्या बहिणीला एक मुलगा व एक मुलगी होती. तिसऱ्या बाळंतपणावेळी दोन्ही मुलांना यांच्या घरी राहायला पाठवले होते.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा पंधरा वर्षांची होते. आमच्या शेजारील घरात एक नवरा - बायको राहत होते. त्यांना मूल नव्हते. बायकोच्या बहिणीला एक मुलगा व एक मुलगी होती. तिसऱ्या बाळंतपणावेळी दोन्ही मुलांना यांच्या घरी राहायला पाठवले होते. मुलगी पाच वर्षांची तर मुलगा अडीच- तीन वर्षांचा होता. यांची मावशी जरा कडकच होती. त्यामुळे पोरे तिला वचकूनच होती.

एके दिवशी मुलगी दरवाजाजवळ उभी होती. तिचा हात दाराच्या बरगडीत तिने ठेवला होता. थोड्या वेळाने तिचा भाऊ आतून येऊन दार पुढे केले. मुलीचा हात दारात सापडला व तिची बोटे चेचरली गेली. माझ्या डोळ्यासमोरच हा प्रसंग घडत असूनही मी काही करू शकले नाही.

दारात हात सापडल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मागे वळून पाहिले तर तिच्या भावानेच दार पुढे केले होते. आता आपण रडलो व बोटांची दशा मावशीला दाखवली तर आपल्या भावाला मावशी मारेल, या विचाराने घडलेला प्रसंग मावशीला कळू दिला नाही. आपल्याला दुखण्यास भाऊच कारणीभूत असूनही त्याची तक्रार कशी करणार. हा प्रसंग बघताना माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले. मी अचंबित झाले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News