100 कोटींचा 'भाईजान'; सलमानने केला विक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे.

दरवर्षी रमजान ईदचा चाँद सल्लूभाईजानच्या चाहत्यांसाठी एक नवं फिल्मी गिफ्ट घेऊन येतो, यंदाही सलमान अन्‌ कतरिनाची जोडी 'भारत' या चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रीनवर धडकली.

सलमानच्या या चित्रपटाने सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये जोरदार कमाई केली. पण, नंतर कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे पडल्याचे दिसत आहे. पण, तरिही 100 कोटींची कमाई आणि सलमान खान हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News