लोकलमध्ये झाडू मारणारी ती...

सुरज पाटील
Monday, 28 January 2019

रात्रीच्या १० वाजताची पनवेलहुन वाशीला जाणारी लोकल. जास्त प्रमाणात गर्दी जरी नसली तरी रात्रीची सुरू असणारी मुंबईतील वर्दळ त्या ट्रेनमध्ये होतीच. मी बेलापूर स्थानकातून त्या लोकलमध्ये बसलो, नेरुळ स्टेशन येताच जवळपास तेरा ते चौदा वयोगटातील, दिवसभर मुंबईतल्या धावपळीमुळे थकल्यारखी वाटनारी एक मुलगी लोकलमध्ये चढली. हाताच्या कोपऱ्यात दाबून धरलेला झाडू, अंगावरती मळकटलेला ड्रेस, ओढणी कमरेत अडकलेली, मोकळ्या हातांवर पडलेला पांढऱ्या रंगाचा ओरबडा, अनवाणी पाय, डोळ्यात अगदी नम्रतेचे भाव, सडपातळ आणि साधारण साडेतीन ते चार फुटाच्या उंचीची, असं तीच वर्णन करण्यास हरकत नाही.

रात्रीच्या १० वाजताची पनवेलहुन वाशीला जाणारी लोकल. जास्त प्रमाणात गर्दी जरी नसली तरी रात्रीची सुरू असणारी मुंबईतील वर्दळ त्या ट्रेनमध्ये होतीच. मी बेलापूर स्थानकातून त्या लोकलमध्ये बसलो, नेरुळ स्टेशन येताच जवळपास तेरा ते चौदा वयोगटातील, दिवसभर मुंबईतल्या धावपळीमुळे थकल्यारखी वाटनारी एक मुलगी लोकलमध्ये चढली. हाताच्या कोपऱ्यात दाबून धरलेला झाडू, अंगावरती मळकटलेला ड्रेस, ओढणी कमरेत अडकलेली, मोकळ्या हातांवर पडलेला पांढऱ्या रंगाचा ओरबडा, अनवाणी पाय, डोळ्यात अगदी नम्रतेचे भाव, सडपातळ आणि साधारण साडेतीन ते चार फुटाच्या उंचीची, असं तीच वर्णन करण्यास हरकत नाही.

नेमकं दैव नशिबाला दोष देत होतं, की नशीब दैवाच्या नावाने शिमगा पिटत होतं, याचं उत्तर तिच्याकडे पाहिल्यांनातर सहजच मिळत होते. ती लोकलमध्ये चढली, लोकल डब्याच्या एका बाजूने हातात असलेला झाडू सैल हाताने खाली फिरवत होती, तेवढाच अर्धा डब्बा झाडू मारायची आणि जेवढ्या जागेत झाडू मारलाय, तेवढ्या जागेत बसलेल्या प्रवाशांच्या वाकून पाया पडायची, जितक्या जलदगतीने झाडू मारत होती, तितक्याच जलद गतीने ती प्रवाशांच्या पाया पडत होती. पाया पडत असताना डाव्या हाताच्या कोपऱ्यात झाडू अडकलेला, उजव्या हाताने प्रवाशांच्या पाया पडायची आणि तोच हात भीक मागण्याच्या उद्देशाने प्रवाशांच्या समोर करायची, पुढचं स्टेशन जुईनगर होतं, तिला तिथं उतरायचं आहे, हे तिच्या गडबडीवरून चांगलंच दिसून येत होतं. कारण लोकल डब्याच्या सगळ्या मोकळ्या जागेत तिने झाडू फिरवला होता, सगळ्या प्रवाशांच्या पाय पडली होती, मात्र सगळ्यांच्या समोर तिने भीक मागीतलीच नाही. कारण ती भीक देणाऱ्या माणसांना चेहऱ्यावरूनच ओळखत होती, काहींनी स्वतःहून तिला भीक दिली, तर काहींनी तिचा हात समोर येताच दोन-चार रुपये हातात टेकवले. 

ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या कित्येकजनांपैकी ती एक होतीच, पण ती त्यांच्यापेक्षा वेगळी होती. ट्रेनमध्ये काहींनी टाळ्या वाजवून भीक मागितली, काहींनी सुरपेटी वाजवून भीक मागितली, काहींनी गाणी म्हणून भीक मागितली, तर काहींनी लहान मुलांना सोबत घेऊन भीक मागितली. अशे कित्येक प्रकार मुंबईच्या धावपळीत दिसून येतील. अशी माणसं समोर आली की मनात नसतानाही भीक देणारी लोकं त्यांच्याबद्दल वेगवेगळे तर्क लावून मोकळे होतात, असाच तर्क जास्तप्रमाणात लावला जातो तो म्हणजे तृतीयपंथ्यांच्या बाबतीत, व्यवसाय न करता स्वतःला समाजाच्या वेगळं समजून त्यांच्या भीक मागण्या बाबतीत. कधी काळी बारकाईने विचार केला की, भीक मागणाऱ्यांच्या घरची आणि कौटुंबिक परिस्थिती नेमकी कशी असावी,यावर संभ्रम निर्माण होतो. कारण त्यांना जास्त भीक मिळत असेल म्हणून त्यांची घरची परिस्थिती योग्य असेल किंवा त्यांना काहीच मिळत नसेल म्हणून परिस्थिती अगदी हलाकीची असेल. काहीच सुचत नाही.

भीक मागणाऱ्यांच्या घरच्या परिस्थितीचा विचार दुसऱ्या दिवशी कामावर जाताना करत होतो, बेलापूरला जायचं असलं तरी रविवारचा मेगाब्लॉक असल्याने जी मिळेल त्या लोकलने कामावर जाण्याचा उद्देश माझा होता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहून आलेली आणि वाशीला जाणारी बारा डब्यांची धीमी लोकल मी पकडली. वाशीला उतरलो, आणि बेलापूरहून जाणारी पनवेल लोकल पकडली. 

जुईनगर स्टेशनला लोकल येताच पुन्हा तीच तेरा चौदा वय असलेली तरुणी मी असलेल्या समोरच्या डब्यात चडली, काल रात्रीपेक्षा चेहरा ताजा तवाणा, गालावर थोडसं नाविलाजाचं हसू, साधारण साडेतीन ते चार फुटांची उंची, सडपातळ, कालच्यासारखा हाताच्या कोपऱ्यात दाबून धरलेला झाडू, अंगावरती मळकटलेला तोच काल रात्रीचा ड्रेस, ओढणी कमरेत अडकलेली, काल दिसत असलेला मोकळ्या हातांवर पडलेला पांढऱ्या रंगाचा ओरबडा आता गायब झाला होता, अनवाणी पाय आणि डोळ्यात अगदी नम्रतेचे भाव. कालचाच प्रकार आज पुन्हा एकदा लोकलच्या डब्यात पाहायला मिळणार होता, तरीही मी गडबडीत माझ्या डब्ब्यातून ती ज्या डब्यात चढली होती, त्या डब्ब्यात चढलो.

सकाळची वेळ असल्याने प्रवाशांची गर्दी जास्त होती, मात्र रविवार असल्याने रोजच्या प्रमाणात कमी होती. तिने आपलं काम सुरू केलं, थोड्याशा जागेवर झाडू फिरवायची, त्या जागेत बसलेल्या प्रवाशांच्या डाव्या हातात झाडू दाबून उजव्या हाताने पाया पडायची, तोच हात लोकांसमोर पसरून भीक मागायची, तितक्याच वेगाने लोकल डब्ब्याच्या पुढच्या जागेवर झाडू फिरवायची. प्रवाशांच्या पाया पडायची आणि भीक मागायची. पुढील स्थानक नेरुळला तिला उतरायचं होतं, हे तिच्या गडबडीवरून स्पष्ट होतं. गडबडीत असल्यामुळे काहींकडे भिक मागणं तिचं राहूनच जात होतं, मात्र लोकलच्य़ा डब्ब्यात झाडू मारण्यात आणि प्रवाशांच्या पाया पडण्यात मात्र ती कूठेच चूकत नव्हती. त्यामुळे लोकलमध्ये झाडू मारणारी ती प्रत्येक दिवशी त्याच स्टेसनवर दिसत असली, तरी तीच्या अंतरीतली भावना गरिबीला जाळून टाकणारी होती. कारण कळकट-मळकट ड्रेस घालून आपल्या वयातल्या मुलींसमोर हात पसरत असताना तिच्याही मनात कुठेतरी तारुण्याची भावना जगत असणार हे नक्की...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News