जुन्या आठवींना दिला उजाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला.

औरंगाबाद - देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी प्लेसमेंट, शैक्षणिक व विद्यापीठ गुणवत्तेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
अभियांत्रिकी प्रथमवर्ष व अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांनी शोध - २००९ मध्ये कशी उत्पादने निर्माण केली, हे डॉ. शिऊरकर यांनी सांगितले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. हर्ष शर्मा यांनी संघटनेच्या या वर्षीच्या घडामोडी, उद्दिष्टे व येणाऱ्या काळात देश व विदेशात स्थापन होणाऱ्या माजी विद्यार्थी संघटनेच्या शाखांविषयी माहिती दिली.

याप्रसंगी माजी विद्यार्थी रामेश्वर गुढे याची एमपीएससीमार्फत कर सहायक पदावर नियुक्ती झाल्याने त्यांनी आपला जीवनप्रवास प्रवास उलगडला. पोटाची भ्रांत असताना आई, वडील आणि भाऊ यांच्याकडून कष्ट, जिद्द, समर्पण व त्याग हे गुण आपल्या जीवनात कशाप्रकारे आत्मसात केले हे त्यांनी सांगितले. तसेच व्यवस्थापनशास्त्र शाखेतील माजी विद्यार्थी योगेश तालोड यांनीही रिलायन्स कंपनीतील सीनियर एचआर मॅनेजर पदापर्यंतचा प्रवास सांगितला.

महाविद्यालयातील शिस्त आणि वक्तशीरपणा कसा उपयोगी पडतो हेही सांगितले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. राजेश औटी, प्रा. रूपेश रेब्बा, डॉ. सुनील शिंदे यांची उपस्थिती होती. उपप्राचार्य प्रा. संजय कल्याणकर, प्रा. प्रकाश तौर, डॉ. गजेंद्र गंधे, प्रा. उमेश पाटील, प्रा. अच्युत भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले. सूत्रसंचालन नोमान खान या विद्यार्थिनीने केले. माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. दीपक गोपेकर यांनी आभार मानले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News