‘मुकाबला’चे रिक्रिएट गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

२५ वर्षांनंतर ‘मुक्काला मुकाबला’ हे गाणं पुन्हा रिक्रिएट केले जाणार आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये जुन्या गाण्यांना रिक्रिएट करण्याचा ट्रेंड सुरू आहे. ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटात नव्वदीच्या दशकातले ‘मुक्काला मुकाबला’ हे गाणं रिक्रिएट करून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

जवळजवळ २५ वर्षांनंतर हे गाणं पुन्हा रिक्रिएट केले जाणार आहे. हे गाणं नृत्य-दिग्दर्शक प्रभुदेवा यांच्यावर चित्रित करण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या चित्रपटात या गाण्यावर त्यांचे डान्स मूव्स बघायला मिळणार आहेत.

या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसतील. दिग्दर्शक रेमो डिसूजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News