अशा बनवा घरगुती अळूच्या वड्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

साहित्य - अळूची पाने, अर्धी वाटी चण्याचे पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचे ज्वारीचे पीठ, ४-५ ओल्या हिरव्या मिरच्या, आले, लसूण, जिरे, पांढरे तीळ, २ चमचे किसलेला गुळ, तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ, खोबरे.

साहित्य - अळूची पाने, अर्धी वाटी चण्याचे पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचे ज्वारीचे पीठ, ४-५ ओल्या हिरव्या मिरच्या, आले, लसूण, जिरे, पांढरे तीळ, २ चमचे किसलेला गुळ, तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ, खोबरे.
कृती - एका भांड्यात चण्याच्या पिठात तांदळाचं पीठ, ज्वारीचे पीठ (नाचणीचं पीठही चालू शकते) आले-लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून त्यात घालावी. या मिश्रणात हळद, कोथिंबीर, पांढरे तीळ, जिरे, मीठ, किसलेला गूळ एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे. दही घालून मिश्रण घट्ट भिजवून घ्यावे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे. अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. देठ कापून टाकावेत. पानाच्या आतल्या बाजूवर मिश्रणाचा पातळ थर हाताने पसरावा. त्यावर दुसरे पान उलटे ठेवावे आणि मिश्रण पसरावे. अशाप्रकारे मिश्रण पसरून दोन्ही बाजूने आत पान दुमडून छान रोल करावा. एका भांड्यावर चाळणीला तेल लावून रोल ठेवून छान वाफेवर उकडून घ्या. थंड झाल्यावर तुकडे पाडून त्याला लसूण-खोबरे बारीक करून त्याची फोडणी देऊन परतून घ्यावी. चविष्ट व हेल्दी अळूची वडी तयार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News