मलायकाच्या फोटोवरुन बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरने उडवली खिल्ली

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
  • मलायकाच्या फोटोवरुन बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरने उडवली खिल्ली 
  • फोटो वरुन मलायका झाली ट्रोल 
  •  मलायकाचे केस सफेद झाले आहेत 

मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि नेहमीच कोणत्या नं कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा मलायका चर्चेत आली आहे, ते म्हणजे तीच्या नव्या फोटोमुळे. मलायकानं इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आपले केस बांधताना दिसते. मलायकानं आपला हा फोटो पाच फोटोंमध्ये शेअर केला आहे. ज्यात मलायका पोनी टेल कसं बांधावं हे शिकवत आहे. हा फोटो शेअर करताना मलायकानं लिहिलं की, ५ स्टेप्स ज्यात तुम्ही पोनीटेल कसं बांधावा हे शिकाल. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#tuesdayteachings .... 5 steps on how u can learn to tie a ponytail .....#tossntie (swipe right )

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मात्र, मलायकाने पोस्ट केलेल्या या फोटो वरुन सोशल मिडीयावर तिची खिल्ली उडवली जात आहे. तर काही लोक तीची मस्करी करत आहेत. मलायकाच्या या पोस्टवर बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरने देखील कमेंन्ट केली आहे. या कमेंटमध्ये अर्जुननं लिहिलं की, ५ फोटोनंतरही केस बांधले नाही. तर काहींनी मलायकाच्या वयावरून तिला ट्रोल केले. मलायकाच वय जास्त झालं आहे, त्यामुळे तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. तसेच  मलायकाचे केस सफेद झाले आहेत. असं मलायकाच्या फोटोवर कमेंन्ट केली आहे. 

सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही मलायकाची पहिलीच वेळ नाही आहे. या आधीही बऱ्याचदा मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. तिच्या फोटोवर कमेंट करून लोकं नेहमीच तिची खिल्ली उडवत असतात. एवढंच काय तर तिच्या वाढत्या वयावरून ही तिला ट्रोल केलं जातं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News