अॅड. प्रकाश आंबेडकर टाकणार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. ईव्हीएमवर प्रकाश आंबेडकर यांनी संताप दाखवत त्यांनी मोदींवर हल्ला केला होता, पण आता तर त्यांनी सरळ विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई: लोकसभा निवडणूकानंतर आता सर्वांचे लक्ष विधानसभेकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीवर  प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणूका जर बॅलेट पेपर नाही झाल्यात तर, आम्ही त्यावर बहिष्कार टाकू,  ईव्हीएममध्ये काही तरी घोटाळा केला असेल म्हणूच वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला असे, प्रकाश आंबेडकर हे म्हणाले. 

प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. ईव्हीएमवर प्रकाश आंबेडकर यांनी संताप दाखवत त्यांनी मोदींवर हल्ला केला होता, पण आता तर त्यांनी सरळ सरळ विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.  

लोकसभा निवडणूक पुर्व ईव्हीएमवर कित्येक लोकांनी आक्षेप घेतला होता. तसेच काहीस यावेळेही पाहायला मिळत आहे. ईव्हीएमवर आम्हाला अगोदरही विश्वास नव्हता आणि आता पण नाही असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर, असे म्हणत ते म्हणाले जर का या विधानसभेत बॅलेट पेपरचा वापर केला तर आम्ही विधानसभा निवडणुक लडवू असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. हीच भूमिका इतर राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. पण मी इतर पक्षांचं सांगू शकत नाही, पण मी या विषयावर मी तर ठाम आहे. जे माझे मत आहे ते आमच्या पक्षात सर्वांचे असतील असे मी स्पष्ट सांगू शकणार नाही. मी यामतावर ठाम आहे 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News