रिक्षाचालकाच्या मुलाला ९४.४० टक्के गुण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • कांदिवली येथील इराणी वाडीतील झोपडीत राहणाऱ्या श्रीवर्धन भोसले
  • वडिलांचा चेहरा पाहिला की स्वतःला अभ्यासात झोकून द्यायचो, अशी प्रतिक्रिया श्रीवर्धन याने दिली.
     

मुंबई : कांदिवली येथील इराणी वाडीतील झोपडीत राहणाऱ्या श्रीवर्धन भोसले या मुलाने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावीत ९४.४० टक्के गुण मिळवले आहेत. श्रीवर्धनने कांदिवलीतील हिल्डा कॅस्टेलिनो मराठी शाळेतून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा मोठा भाऊदेखील याच शाळेतून शिकला. मोठा भाऊ हर्षवर्धन बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता; मात्र नीटच्या परीक्षेत अपेक्षित गुणांअभावी त्याचे डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने घरात सर्वांचा चेहरा उतरला होता. त्यामुळे माझ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

वडिलांच्या रिक्षा चालवण्यातून रोजचा घरखर्च भागवताना अडचणी येत होत्या, परंतु तशाही परिस्थितीत त्यांनी मला खासगी शिकवणी लावली होती. आम्हा भावंडांना भविष्यात चांगल्या पदावर नोकरी करताना त्यांना पाहायचे आहे. म्हणून शाळा, खासगी शिकवणी सांभाळत सहा ते सात तास अभ्यास करायचो. घर रस्त्याच्या बाजूलाच असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे अनेकदा अभ्यासात एकाग्र होता येत नव्हते, परंतु वडिलांचा चेहरा पाहिला की स्वतःला अभ्यासात झोकून द्यायचो, अशी प्रतिक्रिया श्रीवर्धन याने दिली.

माझ्या वडिलांना मला चांगल्या टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण होताना पाहायचे होते. त्यांची ती इच्छा या घवघवीत यशाने पूर्ण झाल्याने खूप समाधान वाटते आहे असेही तो म्हणाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News