नोकरीपेक्षा तर मजूरी बरी..!

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Friday, 28 June 2019

खासजी नोकरदारांचे जीवन मजूरदारापेक्षा हलाखीचे  : NSSO अहवालत उघड

नवी दिल्ली : देशातील रोजगार आणि कामगार यांच्या परिस्थितीची महत्वपूर्ण माहिती नेशनल सैंपल सर्वे ऑर्गेनाइजेशने (NSSO) एका आहवालाव्दारे प्रसिद्ध केली आहे. देशात नोकरी करणारे लोक सर्वांत जास्त वेळ काम करतात आणि मजूरदार हे कमी वेळ काम करतात, असं या अहवालात समोर आले आहे. 

 नेशनल सैंपल सर्वे ऑर्गेनाइजेशनच्या अहवालानुसार, शहरात नोकरी करणारे पुरुष आठवड्याला ६० तास काम करतात. शहरातील मजूर आठवड्याला ४९ तास काम करतात आणि शहरात स्वंयरोजगार करणारे ५८ तास काम करतात. सरासरी नोकरी करणाऱ्या पुरुषांना आठवड्याला ६०. ०३ तास आणि महिला ५२. ०७ तास काम करावे लागते.

भारत देशात ग्रामीण कामगार आठवड्याला ४८ तास काम करतात तर शहरात मजुरांना ५६ तास काम करावे लागते. यावरुन असे स्पष्ट होते की, ग्रामीण मजुरांपेक्षा शहरी मजुरांना अधिक काम करावे लागते. तसेच शहरात नोकरी करणाऱ्या नागरिकांना आठवड्याला ५७-५८ तास काम करावे लागते. महिलांना शहरात ५० तास नोकरी करावी लागते. तसेच शहरी महिला व पुरुषांना अतिरिक्त २-३ तास काम करावे लागते.

नेशनल सैंपल सर्वे ऑर्गेनाइजेशनने ही माहिती २०१७-१८ च्या दरम्यान एकत्रित केली आणि निष्कर्ष काढले. कार्यालयात पुरुषांपेक्षा महिलांना थोड कमी काम कराव लागत. ग्रामीण भागातील पुरुष आठवड्याला ८-९ तास महिलांपेक्षा अधिक काम करतात, असं देखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News