पुस्तके उपेक्षितांचं जिणं जगू लागली

संजय कळमकर
Friday, 19 July 2019

नवीन पुस्तकं पाहिली की ती वाचायला हवीत असं वाटायचं. मात्र, किंमती पाहून पुस्तकं विकत घेणं शक्य नव्हतं.

वाचनाची गोडी वाढत गेली. नवीन पुस्तकं पाहिली की ती वाचायला हवीत असं वाटायचं. मात्र, किंमती पाहून पुस्तकं विकत घेणं शक्य नव्हतं. कॉलेजात जे लायब्ररियन होते ते खडूस होते. 'कुठलं पुस्तक लागतंय ते बाहेरून सांगायचं, आत लायब्ररीत यायचं नाही ' असा त्यांचा खाक्या होता. 

आयकार्डवर आठवड्यातून एकच पुस्तक मिळायचं. खासगी लायब्ररीसाठीची आगाऊ रक्कम व वर्गणी भरण्याइतपत पैसे नसायचे. अनेक ठिकाणी वर्तमानपत्रं मात्र मोफत वाचायला मिळायची.

एखादं नवं पुस्तक हातात पडल्यावर नवा मित्र भेटल्यासारखं वाटायचं. त्यातले शब्द आपुलकीनं जवळ घ्यायचे. अक्षरांच्या झुल्यावर बसून मन आनंदानं डोलायचं. करमणूक व्हायची. नवीन गोष्टी माहीत व्हायच्या. कल्पनाशक्तीला नवे पंख फुटायचे. पुस्तक निस्वार्थी, प्रेमळ मित्राप्रमाणे आपल्याला जपत आहेत.. आपली काळजी वाहत आहेत असं वाटायचं. 

अखंड वाचनानं मनाभोवती एक सुरक्षित कवच तयार होत गेलं. कालांतरानं विज्ञानाचा, मागोमाग तंत्रज्ञानाचा स्फोट झाला. त्यात पुस्तक नावाच्या सह्रद्यी मित्राच्या चिंध्या उडाल्या. लायब्ररीज् ओस पडू लागल्या. अनेक लायब्ररीज् कायमच्या बंदही झाल्या. 'आपल्याला कुणीतरी वाचावं' म्हणून वाचकांऐवजी पुस्तकं अधीर झाली! पण धुंदीत वाहणार्या जगाला याचं भान नाही.

आपल्याला सोडून वाहणारा हा समाज नेमका कुठल्या दिशेला चालला आहे, या कल्पनेनं भयभीत होऊन पुस्तकं उपेक्षितांचं जिणं जगू लागली आहेत. पुस्तकासारख्या उत्तम मित्राला सोडल्याचे अदृश्य दुष्परिणाम माणसाला जाणवणार नाहीत; पण भोगावे लागतील एवढं मात्र खरं!

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News