पुस्तका, पत्रास कारण की.

स्वप्निल करळे, सातारा
Saturday, 26 January 2019

प्रिय
पुस्तक,

काहीसा गडबडीत होतो इतके दिवस. लिहायचं होतं खूप काही; पण तुझ्यातच व्यस्त होतो. पत्रास कारणं की तुझ्यावर लिहिणं झालं नाही. माझ्या घराच्या दिवाणखान्यात एक कपाट आहे. त्यात तुझे वास्तव्य असतं. तुला माहितीये का पुस्तका? तुला संग्रहित करतो आम्ही. तुला वाचतो आम्ही. पुस्तका, माझ्याकडे वृद्धत्वाकडे गेलेलं एक ही पुस्तक नाहीये. असं म्हणतात. वृद्ध माणसं जगण्याचं गणित सोपं करून सांगतात. त्याच माणसांनी काहीतरी कधीतरी लिहून ठेवलं आहे; पण ते जुनं पुस्तक माझ्याकडे नाहीये. 

प्रिय
पुस्तक,

काहीसा गडबडीत होतो इतके दिवस. लिहायचं होतं खूप काही; पण तुझ्यातच व्यस्त होतो. पत्रास कारणं की तुझ्यावर लिहिणं झालं नाही. माझ्या घराच्या दिवाणखान्यात एक कपाट आहे. त्यात तुझे वास्तव्य असतं. तुला माहितीये का पुस्तका? तुला संग्रहित करतो आम्ही. तुला वाचतो आम्ही. पुस्तका, माझ्याकडे वृद्धत्वाकडे गेलेलं एक ही पुस्तक नाहीये. असं म्हणतात. वृद्ध माणसं जगण्याचं गणित सोपं करून सांगतात. त्याच माणसांनी काहीतरी कधीतरी लिहून ठेवलं आहे; पण ते जुनं पुस्तक माझ्याकडे नाहीये. 

ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी माझ्या कपाटात आहे. सर्वात धष्टपुष्ट असं पुस्तकं. मी माझ्या मित्राकडे गेलो होतो, तेंव्हा त्याच्याही जवळ असा संग्रह होता तुझा. त्यानं सर्वात खाली ठेवली होती ज्ञानेश्वरी. मी म्हणालो असं का केलं? तर म्हणाला पुजायची वस्तू अशी वरती ठेवायची असते का? हो, आम्ही ते पुस्तक पूजतो. म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का? नाही. मात्र पुजायच्या आधी आम्ही वाचली नाही ज्ञानेश्वरी याची खंत वाटते.

तू रागावू नकोस हा. मी आपलं असंच म्हणतोय म्हणून दुर्लक्ष तर अजिबात करू नकोस. आम्ही वाचत नाही तर पूजतो. आम्ही माणसं अशीच आहोत आधीपासून. तत्वज्ञान रूपानं तू भेटल्यावर आम्हाला आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तकं छान वाटतात; पण आमच्या देशी तत्वज्ञानाचं काय? धष्टपुष्ट शरीर आणि विचाराने ही धष्टपुष्ट असलेलं पुस्तक आम्ही वाचत नाही. आचरण करत नाही तर आम्ही पारायणं घालतो.असो.

तुझं आमच्या जीवनातलं स्थान अढळ आहे. सर्वोच्च आहे. अरे ज्ञानेश्वरी सोड आम्ही आमच्या संविधानाचीसुद्धा पारायणं करायला लागलोय. ते पुस्तक दिशा देत असतं देशाला. म्हणूनच देशाची दशा बदलत असते आणि आहे. माझ्या कडे तुझी अनेक रूपं आहेत. अरे काय झालं माहिते आहे का? पुस्तकं वाचली जात नाहीत सध्या, अशी ओरड आहे बाहेर. तुझं अस्तित्व ही धोक्यात आलंय का रे? ढसाढसा रडायचं  असेल, तर रडून घे. कारण मी समजतो तुझं दुःख. तुला वाचलं की माणसांच्या पासून लांब जाऊ का रे आम्ही? असं म्हणतात.

ज्याचं मस्तक ठिकाणावर असतं तो पुस्तक वाचतो. पुस्तकाने मस्तक सुधारलं जातं असं म्हंटल जातं. मला माफ करशील का? मला एक परवानगी दे. काही पुस्तकांवर बंदी येते कारण तुझ्या माध्यमातून काही आपला स्वार्थ साधत असतात. माथी भडकवली जातात. दंगली होतात. आणि आम्ही जबाबदार धरतो पुस्तकाला.

पुस्तका, माफ कर. आम्ही सोयीचे लिहितो, सोयीचे बोलतो, सोयीचेच वागतो. कारण आम्ही तसेच आहोत. तुझ्या खांद्यावर आम्ही आमची बंदूक ठेवतो. इतिहास लिहितो, भूगोल बदलतो, संस्कृतीच्या चिंधड्या उडवतो. शेवटी पुस्तकाने गदारोळ झाला, आशा चर्चेमध्ये लागतो. तुझा जन्म होतो कसा? आम्ही पुस्तकाला दैवत्वाचा दर्जा देऊ पाहतोय, दिलाही. मग विटंबना? आम्हीच करतो.

डोक्यातला विचार लेखणीने कागदावर यावा, अशी अनेक कागदावर शब्द संचार वाढवा आणि या कागदांच्या संग्रहाला पुस्तक असं नाव द्यावं. तुझा जन्म व्हावा. मग विचार माणसाने केला आणि आम्ही जाळतो पुस्तकं. आम्ही असेच आहोत. तुला माहितीये का? पुस्तकांची जमात आहे. एक आहे पिढी घडवणारी आणि एक आहे बिघडवणारी. अरे काही माणसं पुस्तकं वाचून बदलली. माणसात आली. माणसानं पुस्तकांच्यातर्फे माणुस माणसात आणला. जगाच्या इतिहासात अजरामर झाली ती माणसं. महात्मा गांधी असोत नाहीतर महात्मा फुले. एक एक पुस्तक माणूस बदलून सोडत गेलं. समाज निर्माण झाला.

तुला माहित आहे का? मी श्रीमंत आहे. करण माझ्याकडे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढे झुकत नाही. हे मी ऐकलं आहे. तुला माहिती आहेत का, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, महात्मा गांधी, डॉ आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशी असंख्य नावे आहेत, ज्यांनी काहीतरी करून दाखवलं. ती माणसं शरीराने लुप्त झाली, मात्र अजून जिवंत आहेत तुझ्या रूपानं. म्हणून आमच्या जीवनातलं तुझं स्थान महत्वाचं.

पुढच्या पिढीला ही माणसं तूच दाखवणारेस. आम्हीही असेच लुप्त होऊ. निघून जाऊ. तू राहशील. लक्षात ठेव. माझ्या पुढच्या पिढ्यांना तयार करायची जबाबदारी तुझी. माफ कर पण तुला ते करावं लागेल. तुला जन्म देणारी लेखक मंडळी जातील काळाच्या ओघात, त्यांना जिवंत ठेवणं हे तुझं काम.
मला वचन दे.
आज तुझा दिवस आहे. पुस्तका, बदललंय तंत्रज्ञान आणि बदलत आहेत माणसं. तू बदलू नकोस. कारण तुझं असणं गरजेचं आहे. तुझं टिकणे गरजेचं आहे. तू नसता तर कसे कळले असते छत्रपती? कसे कळले असे तुकाराम? कसे कळले असते कबीर? विचार कर, तू त्यांच्या अंश आहेस नि वंश आहेस. तुला वारसा चालवावा लागेल पुस्तका. आम्ही जन्म देणारी माणसं खूप कमी काळासाठी इथं आहोत. तू अमर आहेस.
काळजी घे, तुझ्या आयुष्यातील अनेक पानं उलगडून जीर्ण झाली असतील तर पुढची पिढी नक्कीच आशादायी असेल या विश्वासावर थांबतो.

तुझाच,
स्वप्निल करळे, सातारा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News