बंध मुक्त

अशोक पवार
Wednesday, 5 June 2019

तेवढ्यात तिथे एक ओळखीचा
व्यक्ती हसून म्हणाला तुम्ही इथे

काल विलक्षण अनुभव आला
शिणलेल्या जीवाला शांत करावं
म्हणून घेत होतो एकच प्याला 

तेवढ्यात तिथे एक ओळखीचा
व्यक्ती हसून म्हणाला तुम्ही इथे
हसत हसत मी ही म्हंटल
कवी नि घेऊ नये लिहलय का कुठे?

मी मात्र थोडा गंभीर झालो
लिहायला काय लागलो
जणू माझ्या स्वतःच्या इच्छा आकांशा
अश्याच मारायच्या ....

हे मनाला पटत नव्हतं 
विचार करत असताना
कळलच नाही कधी संपलं .....पॅक चौथ.....

आता मात्र थोडा फ्रेश झालो
सोडून दिली जगाची बंधन सारी
जणू मी बंध मुक्त झालो..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News