बॉलीवूडचे दोन ‘फायटर’ एकाच चित्रपटात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

हृतिक आणि टायगर दोघे एकत्र चित्रपटात आल्यावर काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे नक्की आहे. 

अभिनेता टायगर श्रॉफचा नुकताच ‘स्टुडंट ऑफ द ईयर-२’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हृतिक आणि टायगर हे एकत्र चित्रपट करणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

सध्या या चित्रपटाचे शीर्षक ‘फायटर’ असणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. चित्रपटाच्या शीर्षकाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

या चित्रपटात हृतिक आणि टायगरसोबत अभिनेत्री वाणी कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट डान्स आणि ॲक्‍शनवर आधारित आहे. म्हणजेच हृतिक आणि टायगर दोघे एकत्र आल्यावर काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे नक्की आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News