मलायकाचा फॅशन शोमध्ये सिम्पल पण आकर्षक लूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही गेले काही दिवस सोशल मीडियावर सतत ट्रोल होत आहे. सलामान खानचा भाऊ अरबाज खानसोबत तिचा घटस्फोट झाल्यानंतर सोशल मीडियावर तिला अधिकच ट्रोल केलं जाऊ लागलं. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही गेले काही दिवस सोशल मीडियावर सतत ट्रोल होत आहे. सलामान खानचा भाऊ अरबाज खानसोबत तिचा घटस्फोट झाल्यानंतर सोशल मीडियावर तिला अधिकच ट्रोल केलं जाऊ लागलं. पण या सगळ्याचा तिने स्वत:वर काहीही परिणाम होऊ दिला नाही. मलायका नुकतंच एका फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. या फॅशन शोमध्ये तिने रॅम्पवॉक देखील केला. तिचा त्या वेळचा लूक खूपच भारी वाटत होता.

मलायका अरोराने या फॅशन शोमध्ये डिप नेक टॉप आणि लेहंगा परिधान केला होता. मलायकासाठी डिझाइन केलेला हा लेहंगा पूर्णपणे डिझायनर होता. मलायकाने रॅम्पवॉक करताच उपस्थितांनी देखील तिला तुफान प्रतिसाद दिला. यानंतर मलायकाने आपले हे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. 

मलायकाचे इंस्टाग्रामवर अनेक चाहते आहेत. तिच्या या फोटोंना अडीच  लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मलायकाचा या फॅशन शोमध्ये खूपच सिम्पल पण आकर्षक असा लूक पाहायला मिळाला.

मलायका आणि अर्जुन कपूर हे लग्न करणार असल्याची चर्चा बरेच दिवस सुरु आहे. यामुळे ट्रोलर्स मलायकासोबत अर्जुनला देखील आता ट्रोल करत आहेत. पण अर्जुन देखील मलायकाप्रमाणेच सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News