बोगस तृतीय पंथीयाला निर्वस्त्र करून मारहाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019
  • बोगस तृतीयपंथीयांकडून व्यवसायावर गदा येत असल्याच्या रागातून चार तृतीयपंथीयांनी हि मारहाण केल्याची माहिती पत्त्यक्ष दर्शिनी दिली

पनवेल : बोगस तृतीय पंथीयाला निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना कळंबोली वसाहतीत घडली आहे. बोगस तृतीयपंथीयांकडून व्यवसायावर गदा येत असल्याच्या रागातून चार तृतीयपंथीयांनी हि मारहाण केल्याची माहिती पत्त्यक्ष दर्शिनी दिली.

सकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकार नंतर मारहाण करण्यात आलेल्या बोगस तृतीयपंथीयाने माफी मागितल्याने पोलीस ठाण्यात या घटनेची कोणतीही नोंद करण्यात आलेली नसली घडल्या प्रकारची खमंग चरच्या वसाहती मध्ये होती.व्यावसायिक चढाओढीतून तृतीय पंथीयांच्या गटात हाणामारी होण्याच्या घटना या पूर्वीही घडल्या आहेत.

दोन गटातील वादातून एक तृतीय पंथीयांची हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहरात नुकतीच घडली आहे.आपापसातील वादा सोबत बोगस तृतीय पंथीयांशीही व्यवसायात स्पर्धा करावी लागत असल्याने अश्या प्रकारे घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.कळंबोली वेष्टित घडलेल्या घटनेत सायन पनवेल महामार्गावर उभ्या असलेल्या बोगस तृतीयपंथीयास चार तृतीय पंथीयांनी निर्वस्त्र करून जबर मारहाण केली आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News