हिटलरचे शहाणे वारस आणि मूर्ख जनता!

डॉ. विनय काटे, आयआयएम अहमदाबाद
Thursday, 28 March 2019

हिटलरने संबंध जर्मनी स्वतःच्या मागे उभा करण्यासाठी शेजारी राष्ट्रे ही आपली वैरी आहेत, सैतानी आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही भावना प्रत्येक जर्मन माणसाच्या मनात निर्माण केली. स्वतःचे राष्ट्र बलवान करायचे असेल तर त्याला शत्रू निर्माण करा हा हिटलरचा सिद्धांत होता. आणि त्याच्या सिद्धांतावर चालून जर्मनीच सोडा, पूर्ण युरोपची एक पिढी बरबाद झाली. आज जर्मनीत हिटलरचा अनुनय करणे ही आपली घोडचूक होती हे सगळेच मान्य करतात व त्यानुसार हिटलरचे आत्मचरित्र तिथे विकायला सुद्धा परवानगी नाही.

हिटलरने संबंध जर्मनी स्वतःच्या मागे उभा करण्यासाठी शेजारी राष्ट्रे ही आपली वैरी आहेत, सैतानी आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही भावना प्रत्येक जर्मन माणसाच्या मनात निर्माण केली. स्वतःचे राष्ट्र बलवान करायचे असेल तर त्याला शत्रू निर्माण करा हा हिटलरचा सिद्धांत होता. आणि त्याच्या सिद्धांतावर चालून जर्मनीच सोडा, पूर्ण युरोपची एक पिढी बरबाद झाली. आज जर्मनीत हिटलरचा अनुनय करणे ही आपली घोडचूक होती हे सगळेच मान्य करतात व त्यानुसार हिटलरचे आत्मचरित्र तिथे विकायला सुद्धा परवानगी नाही.

हिटलरच्या सत्ताकाळात जर्मनीत कुठलाही मानवी विकास झाला नाही, फक्त सामरिक शक्ती वाढवण्यात स्वतःचा वेळ, पैसा व श्रम खर्च केले गेले. परंतु त्या काळात सरकारच्या आदेशावर चालणारा समस्त जर्मन मीडिया देशात किती झपाट्याने विकास झाला आहे, अर्थव्यवस्था कशी सुधारत आहे अशा बातम्या छापण्यात मश्गुल होता. या सगळ्या आभासी विकासाचा व अतिरेकी सत्ताकांक्षेतून निर्माण केलेल्या वैराचा परिपाक म्हणून दुसरे महायुद्ध झाले आणि शेवटी परत जर्मनी देशोधडीला लागला.

हिटलरने हे सगळे करताना दोन चुका केल्या, पहिली चूक म्हणजे हिटलरने बेधडकपणे वर्णद्वेषी भाषणे व कृत्ये केली. पण हिटलरला आदर्श मानून नंतरच्या काळात जगभरात जे राक्षसी महत्वाकांक्षा ठेवणारे नेते आले त्यांनी हिटलरची ही चूक टाळली. त्यांनी उघडपणे कुठल्याही देशा किंवा धर्माचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे तीच भाषा आपापल्या देशांत वापरत सत्तेचे सोपान चढले. त्यासाठी त्यांनी आपल्या प्यादी वापरली व त्यांच्याकरवी या दंगली, द्वेषमूलक भाषणे करवून घेतली जेणेकरून स्वतःच्या अंगाला घाण न लागता, लोकशाहीत राहूनसुद्धा स्वतःची हुकूमशाही निर्माण करता यावी. स्वतःला शांतीचे, सौहार्दाचे पुरस्कर्ते म्हणवत स्वतःच्या चेल्यांना मात्र द्वेष व हिंसा पसरवायला कुरण मोकळे करून दिले. त्यातुनच यांचे चेले "एकाच्या बदली 100 मारू, नेस्तनाबूत करू" वगैरे भाषा बोलत राहतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशी ढिगाने उदाहरणे आहेत.

हिटलरची दुसरी चूक म्हणचे त्याने शेजारी देशांतील नेत्यांशी खरेखुरे वैर ठेवले. हिटलरचे वारस मात्र ही चूक आता अजिबात करत नाहीत. त्यांनी शेजारी राष्ट्र हे शत्रू आहे असे त्यांच्या देशातल्या लोकांना दाखवताना, स्वतः मात्र त्या शत्रू राष्ट्राच्या नेत्यांशी खूप प्रेमाचे संबंध ठेवले. एकमेकांच्या घरी लग्न, वाढदिवस अशा घरगुती प्रसंगांना हमखास भेटी देत नात्यातला ओलावा जपला. आणि यात दोन्ही देशांच्या नेत्यांचा फायदा असतो, कारण लोकशाहीत आपल्याला जे करायला आपला देश परवानगी देणार नाही ती गोष्ट शत्रू राष्ट्राने आम्हाला करायला भाग पाडले हा कांगावा करायला एकमेकांना मदत करता येते. विशेषतः जेव्हा आपण काहीही सकारात्मक काम न केल्याने जेव्हा आपण निवडणुकीच्या द्वारे सत्तेतून बेदखल होणार आहोत असे दिसायला लागते तेव्हा शत्रू देशातले मित्र मदतीला धावून येतात आणि असे काही तरी करतात की सगळा देश बाकीचे सगळे प्रश्न विसरून यांच्या मागे उभा राहतो.

पाकिस्तानात निवडणूक असली की त्या आधी ते भारतात घुसखोरी हल्ले करतात, जेणेकरून भारताने काही कारवाई केली की आपला सगळा देश आपल्या पाठी उभा राहावा. अमेरिकेत निवडणुकीत मेक्सिकोच्या बाजूची भिंत, मुस्लिम द्वेष वगैरे मुद्दे बनतात. आणि एकदा निवडून आले की डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियात जाऊन शेख सोबत नृत्य करतात. कदाचित ट्रम्प ज्यावेळेस पुढचे इलेक्शन हारायच्या स्थितीत असतील तेव्हा हेच सौदी कनेक्शन तिकडे अमेरिकेत दोन-चार अतिरेकी हल्ले घडवून आणेल (जसे त्यांनी 9/11 ला केले होते) आणि ट्रम्पना परत जनादेश मिळवुन द्यायला मदत करतील.

आंतरराष्ट्रीय राजकारणात आज जरी जगभरात बहुतांश ठिकाणी लोकशाही दिसत असली तरी हिटलरचे असंख्य शहाणे वारस विविध देशांत सत्तेत आहेत. आणि ते सगळे एकमेकांशी खूप सौजन्याने वागत, स्वतःच्या देशातल्या लोकांना दुसऱ्या देशांतल्या लोकांशी झुंजवत सत्तेच्या चाव्या स्वतःच्या हातात ठेवतात. कुणालाही मग मानवी विकास करण्याची गरज पडत नाही, कारण द्वेषाच्या धुरात दुसऱ्याचे सोडा स्वतःचेही कल्याण दिसत नाही. संरक्षण यंत्रणांच्या नावाने मग देशांची तिजोरी खाली करत स्वतःची व स्वतःच्या चेल्यांची तिजोरी भरली जाते. होणाऱ्या युद्धांत मरणारे सैनिक सामान्य घरातलेच असतात. आणि त्यांच्या नावाने गळे काढून लोकांना जोशपूर्ण भाषणे देत हिटलरचे हे शहाणे वारस समस्त जगातल्या जनतेला नेहमी मूर्ख बनवत राहतात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News