प्रेम म्हणजे काय? जाणून घ्या...

जुईली अतितकर
Thursday, 25 July 2019

“प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं” जेव्हा प्रश्न पडतो प्रेम म्हणजे काय? तेव्हा नकळत ओठावर येणाऱ्या या मंगेश पाडगावकरांच्या ओळी, पण याच ओळींना बगल देत मी म्हणेन “ प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसलं तरी कुठे बिघडलं, एकमेकांचं tuning मिळत जुळत असतं. विविधता हा तर निसर्ग नियम आहे. दोन भिन्न परिस्थिती, दोन भिन्न स्वभाव आणि दोन भिन्न व्यक्तीना जोडणारा सुरेख मध्यबिंदू म्हणजे प्रेम, नाही का?  प्रत्येकवेळी कसं सारखं असेल हे प्रेम.

“प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं” जेव्हा प्रश्न पडतो प्रेम म्हणजे काय? तेव्हा नकळत ओठावर येणाऱ्या या मंगेश पाडगावकरांच्या ओळी, पण याच ओळींना बगल देत मी म्हणेन “ प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसलं तरी कुठे बिघडलं, एकमेकांचं tuning मिळत जुळत असतं. विविधता हा तर निसर्ग नियम आहे. दोन भिन्न परिस्थिती, दोन भिन्न स्वभाव आणि दोन भिन्न व्यक्तीना जोडणारा सुरेख मध्यबिंदू म्हणजे प्रेम, नाही का?  प्रत्येकवेळी कसं सारखं असेल हे प्रेम.

या भूमीवर हा सजीवांचा बोजा नुसताच खितपत पडू नये म्हणुन त्याला भावनांच्या आणि प्रेमाच्या धाग्यात बांधले असावे कदाचीत, त्यामुळेच त्याला सौंदर्यदृष्टी आणि जिवंतपणा jiआला असावा. हे असं गजब प्रेमाचं नातं एकमेकांना घट्ट बांधून ठेवणार, जे असतं आपल्या जवळच्या व्यक्तीशी, घरच्यांशी, मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी, पशू पक्षाशी, निसर्गाशी किंवा एखाद्या निर्जीव वस्तुशी जी त्याला भावनांचा जिवंतपणा देते. कोणतेही नियम नाही, बंधन नाही, भाषा किंवा अपेक्षा नाही.

प्रेमाबद्धल बोलायचं तर तो दिवस म्हणजे वेलेन्टाइन डे. दिवसागणिक वेलेन्टाइन डे ची महती लहानापासून मोठ्यांपर्यंत वाढलेली दिसते. त्यांना विचारले प्रेम म्हणजे काय? तर कंमिटमेंट, रिलेशनशिप, गुलाब, प्रोपोज, गिफ्ट आणि प्रेमाचा संदेश देणारे एखादे कार्ड ही प्रतिक्रिया हमखास मिळते. थोडं क्रेझी करणारं हे वेलेन्टाइन प्रेम. याच आंधळ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या बाजू , वेगवेगळ्या रंगछटा आपण या पुढे पाहू. त्यात कृष्ण- सुदामा च मित्र प्रेम ही आहे तर लोकमान्य, सावरकरांचं देश प्रेम ही आहे. इतिहासातही या निष्पाप प्रेमाचे दाखले मिळतात नाहीतर शिवपुत्र संभाजी सई बाईच्या उदरी जन्म घेऊन धाराऊच्या दुधावर का निपजला असता? देवकीचा कृष्ण यशोदेला माई का म्हणला असता?, पुत्र वियोगाने आसुसलेली हिरकणी, तिने मोठया शौर्याने चढलेली कडा आणि तिच्या धडसापुढे शिवराय सुद्धा नतमस्तक झाले. आई- मुला मधलं हे आंधळं प्रेम म्हणजे दुधावरची साय तशी लेकराची माय…

“आधी लगीन कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं” अशी गर्जना करणारे तानाजी मालुसरे , जिवा महाला, असे आपल्या जीवावर उदार होऊन स्वराज्याचे पाया रचणारे इतिहासातील अजरामर व्यक्तिमत्व राजाप्रती रांगड्या प्रेमाचं उदाहरण देतात ‘ मग जान गेली तरी बेहत्तर.’ महाराष्ट्राच्या मायभूमीला वारकरी संप्रदायाची खूप मोठी आणि अमूल्य परंपरा लाभली आहे. सलग तीन महिने अन्न, वारा, पाण्याची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन पायी पंढरपूर पर्यंत प्रवास करायचा, ते ही विठ्ठला वर असलेल्या श्रद्धेपोटी, रंगून जायचं त्याच्या भजनात, कीर्तनात. ही भक्ती आणि श्रद्धा आंधळं प्रेम नाही का?

आमचा तुमचा माणूस न पाहता येणाऱ्या वारकाऱ्याला मीठ- भाकरीचा का होईना प्रसाद वळणा- वळणावर का भरवावा वाटेल कोणाला? निस्वार्थी बुद्धीने केलेली ही वारकऱ्याची सेवा किंवा दीड- दोन महिन्यांच्या वारीनंतर झालेलं विठ्ठल दर्शन आंधळं प्रेम नाही का? आहे. त्यात माया, करुणा, काळजी आणी समर्पण आहे. थोडं mismatching आहे, तर थोडं understanding ही आहे. थोडे रुसवे- फुगवे आहे, तर थोडी मजा मस्ती आहे. कधी समुद्राप्रमाणे खोल तर कधी लाटाप्रमाणे उथळ आहे.

इमर्जन्सी वोर्डमध्ये आलेल्या मातेचा एक अनुभव सांगावासा वाटतो, अपघातात दोन्ही हातांना जखमा झालेली ती महिला शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा आपल्या तीन महिन्यांच्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकते आणि हातात शक्ती नसताना ही मुलाची भूक शमवते. क्षणार्धात आपलं दुखणं विसरून तिच्या बाळाप्रती तीच आंधळं प्रेम वाहू लागतं, आजूबाजूला असलेल्या डॉक्टरांचे डोळेही या मातृप्रेमापुढे पाणावतात. प्रेम खरंच आंधळं असतं त्यात काही शंका नाही पण डोळस विचारांनी ते ओळखता आलं आणि योग्य दिशेने साधता आलं, नात्यात बांधता आलं की त्याच सार्थक होतं.

कालच देशमुखांनी बऱ्याच दिवसांनी बायकोसाठी तुपातला शिरा करण्याचा बेत आखला. सकाळ- सकाळी बायकोसमोर गरमा-गरम शिरा, डिओवर मोहमद रफिची धून सुरू होती ‘ चौदवी का चाँद हो तुम, या आफताब हो, जो भी हो खुदा की कसम लाजवाब हो..” पहिलाच घास घेतल्यावर कळलं शिऱ्यातल्या रव्याची जागा वऱ्याच्या रव्याने घेतली. देशमुखांनी प्रतिक्रिया विचारल्यावर त्याच्या कानावर पडलेलं वाक्य “ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळं सेम नसलं तरी कुठे बिघडलं, tuning मिळत जुळत असतं”. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News