सामाजिक संदेशाचा ‘ब्लॅंकेट’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

दिग्दर्शक राज गोरडेही सामाजिक संदेश देणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ‘ब्लॅंकेट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. 

मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शक-निर्माते प्रामाणिक प्रयत्न करत असतात. आता दिग्दर्शक राज गोरडेही सामाजिक संदेश देणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ‘ब्लॅंकेट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. 

महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण याबाबत बरीच चर्चा केली जाते. मात्र, परिस्थिती पाहता महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. महिला सक्षम असून देखील घरातील कर्त्या पुरुषाला विचारूनच प्रत्येक निर्णय तिला घ्यावे लागतात. 

समाजाच्या याच मानसिकतेवर ‘ब्लॅंकेट’ चित्रपट आधारित आहे. आकाश शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळाही नुकताच पार पडला. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार, हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News