'ब्लॅकलिस्टेड बॉईज' चा हिप हॉप तडका

महॆश घोलप
Thursday, 31 January 2019

हिप हॉप म्हणजे नेमकं काय? तर या संगीतामध्ये कलाकार आपले जगणे, समाजाबद्दल, सामान्य नागरिकांच्या समस्या, तसेच नवीन नवीन विषय हाताळत त्याला लयबद्ध करतात. भारतामध्ये वेगवेगळ्या विभागातून मोठया संख्येने नवोदित  कलाकार(rapper) वेगवेगळे विषय घेऊन नवीन म्युझिक तयार करत आहेत.

   जगभरामध्ये सध्या हिप  हॉप म्युझिकचे जोरदार वारे वाहत आहेत. त्याची क्रेझ भारतामध्येही पाहायला मिळत आहे. मुंबईत  देखील मोठ्या प्रमाणात हिप हॉप म्युझिक ऐकणारा तरुणवर्ग तयार झाला आहे. धारावी मधील 'ब्लॅकलिस्टेड बॉईज'  देखील या स्पर्धेत उतरले आहेत. सहा तरुण मुलांचा हा म्युझिकल ग्रुप आहे. या ग्रुपमधील काही तरुणांनी संपूर्ण वेळ संगीतासाठी दिला आहे, तर काहीजण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. स्टीव्ह, शिरीष, सनीज, राहुल, गिरीष, ओमकार अशी या ग्रुपमधील तरुणांची नावे आहेत.     
     या तरुणांनी आपले 'सोच' नावाचे नवीन गाणे त्यांनी नुकतेच युट्युबवर अपलोड केले आहे. यापूर्वी त्यांनी 'गणू' या मराठी चित्रपटामध्ये देखील एक गाणे दिले आहे. ही तरुण मंडळी धारावीमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. ही कलाकार मंडळी आपली गाणी तयार करून  युट्युबच्या माध्यमातून त्याची पब्लिसिटी करतात. त्यांच्या चाहत्यांचा मोठा वर्ग निर्माण होत आहे. संगीत क्षेत्रात त्यांनी नुकतेच पाऊल ठेवले आहे. 'ब्लॅकलिस्टेड बॉईज' च्या या गाण्याला नेटिझन्सकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 
     हिप हॉप म्हणजे नेमकं काय? तर या संगीतामध्ये कलाकार आपले जगणे, समाजाबद्दल, सामान्य नागरिकांच्या समस्या, तसेच नवीन नवीन विषय हाताळत त्याला लयबद्ध करतात. भारतामध्ये वेगवेगळ्या विभागातून मोठया संख्येने नवोदित  कलाकार(rapper) वेगवेगळे विषय घेऊन नवीन म्युझिक तयार करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News