काळा रंग असणाऱ्यांची ही खास वैशिष्ट्ये

विशाल लोनारी
Friday, 19 July 2019

रंगावर कुणाच्या काहीच अवलंबून नसते. सौंदर्यदृष्टीपुरताच विचार केला तर गोऱ्या रंगाकडे जितकं कमी बघावंस वाटलं तितकंच काळा रंग मला माझ्याकडे ओढत नेतो.

गोऱ्या कातडीचे आकर्षण प्रत्येकालाच होते. गोऱ्यापान सौंदर्यावर कुणाचंही भाळण विशेष गोष्ट नाही. काळ्या रंगावर मोहून जाणं खरं निस्सीम प्रेमात पडणं असे मला वाटते. मला गोऱ्या किंवा आरस्पानी रूपाचा अपमान करायचा नाही. त्यांचा हेवा मला आहेच. पण राव, काळ्या सौंदर्यात जो अस्सलपणा मला जाणवला आजपर्यंत त्याला तोड नाही. रंगावर कुणाच्या काहीच अवलंबून नसते. सौंदर्यदृष्टीपुरताच विचार केला तर गोऱ्या रंगाकडे जितकं कमी बघावंस वाटलं तितकंच काळा रंग मला माझ्याकडे ओढत नेतो. पुन्हा पुन्हा त्याकडे मन धावून जातं. जर रुपवावर कोरीव काम केल्याप्रमाणे इंद्रियांची रचना असेल तर मग मी क्लीन बोल्डच.

मला बहुतेकवेळेस काळ्या रुपातले ओठ फार लुभावतात. मादकतेच्या व्याख्यात तंतोतंत बसणारे, खालचा ओठ जरासा जाड, मोठी म्हणू अशी जीवनी ही सौंदर्यमापके मोडून काढतात. लाल चुटुक तर वेधक आहेतच, पण काळ्या रंगाचे असतील तर त्यांच्यावर न भाळणारी व्यक्ती सापडणे अशक्यच. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे स्माईल, दंतपंक्ती ही अनेकांची सारखी असते, सरळरेषेत, समआकरच हुरळून जायला लावतोच लावतो. निरखून पाहत राहावं असेच वाटत जाते. दुसरी वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे डोळे. तेही काळ्याभोर चेहेऱ्यावर अगदी लखलख करतात. त्यांचा आकारही कर्दळीच्या पानांसारखा, मासाच्या डोळ्यांसारखा.

त्यात बुबुळ सोडलं तर बाकी भागात थोडासा पिवळट रंग असला तर दिलखेचक शब्दाची पुरेपूर प्रचिती घेता येते. अगदीच कावीळ झाल्याप्रमाणे असलेले डोळे नाहीच आवडणार. मला वाटतं काळ्या चेहेऱ्यावर अगदी रोखठोक, रोखून बघणारी नजर फारच उठून दिसते. प्रत्येकवेळी बघताना तुम्हाला आव्हान देत असल्याचा भास होतो. विचारांप्रती प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न असते. ही काळी माणसं सुखद अनुभव देणारी पाहिली आहेत. आपला स्वतःचा एक तोरा तर ठेवायचाच. एक विशिष्ट पद्धतीने अगदी खास करून जीवन तर जगायचे पण उगाच दुसऱ्यांना पाण्यात बघायचे नाही. दुखवायचे नाही. असा एक अतुल्य गुण असणारी व्यक्ती काळीच असते, असे दिसत आलंय. गोऱ्या कातडीची खास गोष्ट म्हणजे त्यावर थोडा मळ असेल तर फार विचित्र दिसत नाही. काळ्या रंगाचे स्वच्छतेशिवाय खुलणे थोडे अवघडच.

त्यामुळे काळसर लावण्याला अस्सल झळाळी प्राप्त होते. काळ्या रंगाची ठिणगी. जी एकडाव बघणाऱ्याला चेतवून टाकते. परत परत बघत राहण्याखेरीज कसलाच पर्याय समोर राहत नाही. पुन्हा बघून आपण फक्त जळत राहायचं. आतल्या आत. घायाळ होत जायचं, बघत बघत पुरतं स्वतःला संपवून जाण्याकडे आपोआप कल जातो. बघताक्षणी बस काय करू नी काय नको करू अशी अस्थिर अवस्था तयार होते. आपण बऱ्यापैकी मग कौतुक करायचं, कितीही केलं तरी ते कमीच, करत राहायचं.

कधीकधी कुणाला फाजील कौतुक वाटते. काळा रंग असल्याने अढळ असा आत्मविश्वास स्वतःचा नसतो. हा वेडा समज अगदी दूर सारायला शक्य होईल तितकं झुंजायचं, समजवायला. अगदी शंख शिंपल्यातील मोत्याच्या उपमा देऊन कदाचित समाधान होणार नाही. नशा देणारी द्राक्षची उपमा अवीट गोडीची ठरेल. बेफाम, सुसाट कौतुक काही थांबू द्यायचं नाही. वाहून जाता आलं तर वाहून जायचं. संपायचं नसलं तरी थांबायचंही नाहीच. लय वेडं करून सोडतो हा ‘घायाळ’ करणारा काळा रंग

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News