या भाजपच्याच आमदाराने केला जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • विरोधकांना मात्र आयती संधी

सांगली : भाजपमधील मतभेद पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीआधी समोर आले आहेत. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी घरचा आहेर दिला आहे. 'भगवी वस्त्र घालणाऱ्या स्वामींनी त्यांचं काम करावं. अशा व्यक्तींचं राजकीय क्षेत्रात काय काम?' असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

आमदारांनी आपल्याच पक्ष्याच्या खासदारांवर टीकास्त्र चालवल्यामुळे विरोधकांना  मात्र आयती संधी मिळालेली आहे.  प्रत्येक पक्षाने विधानसभेसाठी जोरदार   तयारी सुरु केली  आहे . भाजपाही राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी  कामाला  लागली आहे. 

सत्ताधार भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची आज मुंबईतील वसंतस्मृती इथं महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News