भाजपच्या महाजनादेश यात्रेला १ ऑगस्टपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • अमित शहांच्या हस्ते उद्‌घाटन;
  • समारोपाला पंतप्रधान मोदी

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, येत्या १ ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५० विधानसभा मतदारसंघांत महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे उद्‌घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते; तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ करणार आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

विभागवार यात्रा
विदर्भ : १२३२, किलोमीटर (४४ मतदारसंघ)
उत्तर महाराष्ट्र : ६३३ किलोमीटर (३४ मतदारसंघ )
मराठवाडा : १०६९, किलोमीटर ( २८मतदारसंघ)
पश्‍चिम महाराष्ट्र : ८१२ किलोमीटर (२९ मतदारसंघ) 
कोकण : ६३८ किलोमीटर (१५ मतदारसंघ)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News