शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी भाजपने दिल्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 10 November 2019

मुंबई  राज्यात जनतेने महायुतीला कौल दिला असला तरी, भाजप-शिवसेना मित्र पक्षात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं. शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिली तर, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. जवळपास गेल्या 15-20 दिवसांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना, काल राज्यपाल भगतसिंग कोश्यार यांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेसाठी निमंत्रित केले. त्यावर आज दुपारी भाजपच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ठाम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी बैठक घेण्यात आली. त्यात शिवसेनेला मुख्यमंत्रिपद (अडीच वर्षांसाठी) न देण्यावर भाजप नेते ठाम राहिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जर, शिवसेनेने सत्ता स्थापन केली तर, आपण विरोधात बसू, असा निर्णय भाजप नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 

शिवसेनेने सरकार बनवावं आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, आम्ही सरकार बनवण्यासाठी असमर्थ आहोत असही भाजपकडून राज्यपालांना  सांगितलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News