सेनेला देव सदबुद्धी देवो म्हणत 'या' शहरात भाजपकडून होमहवन

सकाळ (यिनबझ)
Thursday, 7 November 2019

भाजपने आज राज्यपालांची भेट घेतली असली तरी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना सर्व अधिकार दिले आहेत. मात्र सरकार कोण स्थापण करणा याकडे सर्वाचं लक्ष लागुन आहे.

नागपूर - विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अद्यापही ठरलेली नाही. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीचं सरकार अजूनही स्थापन न झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते अशाप्रकारे देवाकडे साकडं घालत आहे.

शिवनेसेनेला देव सदबुद्धी देवो आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुजा आणि हवन करण्यात आलं . नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात ही पुजा करण्यात आली. भाजप नेते भुषण शिंगने यांनी या पुजेचं आयोजन केलं होतं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या हातात शिवसेनेला सदबुद्धी दे भगवान अशा आशयाचे बॅनरही दिसले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु मुख्यमंत्रिपदावरुन युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. भाजपने आज राज्यपालांची भेट घेतली असली तरी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना सर्व अधिकार दिले आहेत. मात्र सरकार कोण स्थापण करणा याकडे सर्वाचं लक्ष लागुन आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News