भाजप या सरकारला सुरुंग लावण्याच्या तयारीत?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • मध्य प्रदेशात नाराज आमदार संपर्कात आहेत.
  • महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभेची निवडणूक ऑक्‍टोबरमध्ये होणार आहे.
  • मध्य प्रदेशात सत्ताबदल होईल काय, असे विचारले असता, ‘त्याआधीच काहीही घडू शकते

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सरकारच्या मागे हात धुवून लागलेल्या भाजपने मध्य प्रदेशातही कमलनाथ सरकारला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे सूतोवाच भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिले आहेत. 

मध्य प्रदेशात नाराज आमदार संपर्कात आहेत. मात्र निवडणुका कोणालाही नको असल्याने धाडसी निर्णयाआधी सर्वजण आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याची चाचपणी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभेची निवडणूक ऑक्‍टोबरमध्ये होणार आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात सत्ताबदल होईल काय, असे विचारले असता, ‘त्याआधीच काहीही घडू शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच चमत्कार होऊ शकतो,’ असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. कमलनाथ गट, दिग्विजयसिंह गट आणि ज्योतिरादित्य शिंदे गट अशा गटबाजीत सत्ताधारी काँग्रेसच नव्हे तर सरकारचेही विभाजन झाल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याकडे या सूत्रांनी लक्ष वेधले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News