शालेय पोषण आहार भाजपाच्या घशात ! 

मंगेश गोमासे, नागपूर
Sunday, 7 July 2019

पदाधिकाऱ्यांना कंत्राट : दिल्लीसह, आसामच्या सक्षम संस्थांना बगल 

नागपूर - शहरातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्यासाठी दहा दिवसांपूर्वी शहरातील दहा संस्थांना कंत्राट देण्यात आले. मात्र, योजनेंतर्गत शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संस्था या भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या असल्याने आता या प्रक्रियेवर शंका निर्माण होत आहे. 

शहरात आतापर्यंत केवळ "अक्षयपात्र फाऊंडेशन' या संस्थेमार्फत दक्षिण- पश्‍चिम मतदारसंघातील शाळांना शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा केल्या जात होता. त्यामुळे इतर शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, शहरातील संपूर्ण शाळांनाच शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातूनच 6 मे रोजी जाहिरात देत, निविदा मागविण्यात आल्यात. 26 मेपर्यंत निविदा प्रक्रियेतून 20 संस्थांचा 21 निविदा प्राप्त झाल्यात. यात दिल्लीतील सहा आणि आसाममधील सक्षम संस्था तर शहरातील 13 संस्थाचा समावेश होता. दरम्यान निविदांमधून संस्थांची निवड करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले होते.

यात प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिव तर अप्पर आयुक्त उद्योग महामंडळ, अन्न व औषध प्रशासन विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि महानगरपालिकेतील एका सदस्याचा समावेश करण्यात आला होता. या समितीद्वारे संस्थांची तपासणी करुन दहा संस्थांची निवड करण्यात आली. त्यांची नावे काही दिवसांपूर्वीच जाहिर करण्यात आली. मात्र, ही निवड करताना दिल्लीत शालेय पोषण आहार देणाऱ्या नामवंत संस्था आणि आसाममधील संस्थेचाही समावेश होता. या संस्थांना शहरात "किचन' नसल्याचे कारण देत नकार देण्यात आला.

याउलट शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या संस्थांना महत्व देत, पोषण आहाराचे कंत्राट बहाल करण्यात आले असल्याचे निदर्शनास येते. यामुळे एकूणच प्रक्रियेवर आता संशय व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे या संस्थांची नावे देत असताना, त्याठिकाणी दिलेल्या ई-मेल आयडीमधील नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांकातून ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचे निदर्शनास येते. 

पदाधिकाऱ्यांना कंत्राट : दिल्लीसह, आसामच्या सक्षम संस्थांना बगल 
नागपूर शहरातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्यासाठी दहा दिवसांपूर्वी शहरातील दहा संस्थांना कंत्राट देण्यात आले. मात्र, योजनेंतर्गत शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संस्था या भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या असल्याने आता या प्रक्रियेवर शंका निर्माण होत आहे. 

शहरात आतापर्यंत केवळ "अक्षयपात्र फाऊंडेशन' या संस्थेमार्फत दक्षिण- पश्‍चिम मतदारसंघातील शाळांना शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा केल्या जात होता. त्यामुळे इतर शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, शहरातील संपूर्ण शाळांनाच शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातूनच 6 मे रोजी जाहिरात देत, निविदा मागविण्यात आल्यात. 26 मेपर्यंत निविदा प्रक्रियेतून 20 संस्थांचा 21 निविदा प्राप्त झाल्यात. यात दिल्लीतील सहा आणि आसाममधील सक्षम संस्था तर शहरातील 13 संस्थाचा समावेश होता. दरम्यान निविदांमधून संस्थांची निवड करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले होते. यात प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिव तर अप्पर आयुक्त उद्योग महामंडळ, अन्न व औषध प्रशासन विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि महानगरपालिकेतील एका सदस्याचा समावेश करण्यात आला होता.

या समितीद्वारे संस्थांची तपासणी करुन दहा संस्थांची निवड करण्यात आली. त्यांची नावे काही दिवसांपूर्वीच जाहिर करण्यात आली. मात्र, ही निवड करताना दिल्लीत शालेय पोषण आहार देणाऱ्या नामवंत संस्था आणि आसाममधील संस्थेचाही समावेश होता. या संस्थांना शहरात "किचन' नसल्याचे कारण देत नकार देण्यात आला. याउलट शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या संस्थांना महत्व देत, पोषण आहाराचे कंत्राट बहाल करण्यात आले असल्याचे निदर्शनास येते. यामुळे एकूणच प्रक्रियेवर आता संशय व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे या संस्थांची नावे देत असताना, त्याठिकाणी दिलेल्या ई-मेल आयडीमधील नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांकातून ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचे निदर्शनास येते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News